कोण आहे अभिनेत्री प्राची पिसाट ?

अभिनेत्री प्राची पिसाट हिने काही दिवसांपूर्वी अभिनेता सुदेश म्हशीलकर यांच्यावर अश्लील मेसेज पाठवल्याचे गंभीर आरोप केले.

प्राची पिसाट हे प्रकरण सध्या खूप चर्चेत आहे त्या निमित्तानेच जाणून घेऊया की अभिनेत्री प्राची पिसाट नक्की आहे तरी कोण ?

प्राची पिसाट ही एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे तिने आत्तापर्यंत अनेक मोठ्या ब्रँड साठी मॉडेलिंग केले आहे.

स्टार प्रवाह वरील गाजलेली मालिका "देवयानी" यामध्ये तिने खलनायिका साकारली होती.

तसेच प्राची पिसाट हिने 'राधा प्रेम रंगी रंगली', नकळत सारे घडले, तु चाल पुढे या मालिकेमध्ये देखील काम केले आहे.

सुदेश म्हशीलकर प्रकरणात अनेक दिग्गज कलाकार प्राची पिसाट हिला पाठिंबा देण्यासाठी सरसावले आहे