‘पांडू’ सिनेमाचा भन्नाट ट्रेलर तुम्ही पाहिलात का ?
आपल्या अभिनयाच्या व विनोदी शैलीवर जनमानसांत स्वतःचे स्थान निर्माण करणाऱ्या कुशल बद्रिके व भाऊ कदम यांचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘पांडू’ असे या सिनेमाचे नाव असून या सिनेमाचा नुकताच ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. सोशल मीडियावरही या ट्रेलरची चर्चा सर्वत्र होते आहे.
View this post on Instagram
एक मिनिटे बावीस सेकंदाच्या या प्रोमोमध्ये कुशल व भाऊंचा अभिनय प्रेक्षकांना हसवून जातो. पांडू व महादू या दोन मित्रांवर आधारित या सिनेमाची कथा आहे. साधाभोळा पांडू व चतुर महादूच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना अगदी मजेशीर पद्धतीने सिनेमात मांडण्यात आल्या असल्याचे ट्रेलर पाहिल्यास आपल्या लक्षात येईल. अवधूत गुप्ते यांनी संगीत दिलेल्या या सिनेमातील सर्वच गाणी लोकप्रिय झाले असून केळेवाली या गीताने अवघ्या चोवीस तासांमध्ये दहा लाख व्हियूज मिळवले आहेत. येत्या ३ डिसेंबरला प्रदर्शित होणारा हा सिनेमा प्रेक्षकांना खळखळून हसवेल यात तिळमात्र शंका नाही.