सूर्यकांत कदमने ठेवला अहिल्यासमोर एक करार !

‘पारू’ मालिकेत सर्वांचा लाडका अभिनेता भरत जाधव ह्यांनी एन्ट्री घेतली आहे. भरत जाधव एक दमदार खलनायकाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. प्रोमो मध्ये तुम्ही सूर्यकांत कदमचा आकर्षक लुक तर पाहिलाच असेल. जितका खतरनाक लुक आहे तितकीच जबरदस्त ही भूमिका आहे. सूर्यकांत कदम अहिल्यादेवींच्या आयुष्यात उलथापालथ करायला आला आहे. तर दुसरीकडे पारू आपल्या निरागस स्वभावाने सगळयांना गावाकडच्या जीवनाचा आनंद घ्यायला शिकवत आहे.

गावच्या वेशात पारू आदित्य आणि प्रीतमला तयार करते. आदित्य ही पारूला हरीषसाठी प्रेमाची दारं उघडायला सांगतोय. सूर्यकांत कदमने आपला पहिला डाव खेळला आहे त्याने श्रीकांतला गायब केलय. अहिल्याला घरावरचा धोका समजतो. अहिल्या समोर सूर्यकांत एक करार ठेवतो. काय आहे तो करार ? अहिल्या समोर हे कोणतं नवं संकट येणार आहे? हे जाणून घेण्यासाठी पाहत राहा ‘पारू’ दररोज संध्या ७:३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.

Leave a Reply