शिवा आणि आशूची मैत्री अजूनच घट्ट होणार !
‘शिवा’ मालिकेत खूप रंजक गोष्टी घडत आहे. ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. किर्तिला चंदन आणि दिव्याच्या प्रेमाबद्दल कळत, ती प्रिया आणि सुहाससोबत मिळून दिव्याच भांडाफोड करायचा प्लॅन बनवते. इकडे बिझनेसमध्ये लक्ष नसल्याने रामभाऊ आशुवर चिडतात आणि आशु घर सोडून बाहेर पडतो. शिवाच्या सांगण्यावरून आशुला पटत की बाबांच्या माझ्याकडून काही अपेक्षा आहेत म्हणून तो जाऊन क्लाएंटशी मीटिंग करतो, आणि ती मिटिंग यशस्वी होते.
सीताई शिवाच्या घरी कामानिमित्त गेली असता तिला घरातून बाहेर पडणारी शिवा दिसते, ती शिवा बद्दल विचारपूस करते तेव्हा शिवा शेजारी राहते असं वंदना खोट बोलते. सीताई दिव्याला शिवापासून दूर राहायचा सल्ला देते. इकडे वस्तीत होणार्या क्रिकेट टूर्नामेंट मध्ये शिवा, गॅंग, आशु आणि मांजा भाग घेतात आणि त्यातून मिळणाऱ्या रकमेतून वस्तीतील मुलांना शाळेच साहित्य आणायचं ठरवतात. तिथे शिवा आणि आशूची मैत्री अजूनच घट्ट होते.
आता ह्या घट्ट मैत्रीचं रूपांतर प्रेमात होईल ? शिवा- आशुच्या नात्यात काय बदल घडेल ? यासाठी पाहायला विसरू नका ‘शिवा’ दररोज रात्री ९ वा. फक्त आपल्या झी मराठीवर.