गोडवा वाढवणारी ‘जिलबी’ भेटीला

 

‘जिलबी’ … नाव उच्चारलं तरी तोंडाला पाणी सुटतं. चवदार लुसलुशीत जिलबी आपल्या संगळ्यांनाच आवडते. अशीच एक लज्जतदार ‘जिलबी’ आपला मनाचा गोडवा वाढविण्यासाठी आपल्या भेटीला येणार आहे, पण… मराठी चित्रपटरूपाने. अभिनेता प्रसाद ओक, स्वप्निल जोशी, शिवानी सुर्वे, पर्ण पेठे, गणेश यादव, प्रणव रावराणे, अश्विनी चावरे, प्रियांका भट्टाचार्य या कलाकारांनी ही ‘जिलबी’ प्रेक्षकांसाठी आणली आहे.

आनंद पंडित मोशन पिक्चर यांची निर्मिती असलेल्या ‘जिलबी’ चित्रपटाचे दिग्दर्शन नितीन कांबळे यांचे आहे. नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त संपन्न झाला असून चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे.

रसिक प्रेक्षकांचा आनंद द्विगुणीत करायला आणि मनाचा गोडवा वाढवायला चांगला विषय प्रेक्षकांसाठी घेऊन येत असल्याचे निर्माते आनंद पंडित यांनी सांगितले. वेगवेगळ्या आशय विषयाचे अभिरुचीसंपन्न चित्रपट मराठीत येताहेत. आम्ही आणलेली ही ‘जिलबी’ तिचा गोडवा प्रेक्षकांच्या मनात नक्कीच उतरेल असा विश्वास दिग्दर्शक नितीन कांबळे यांनी व्यक्त केला.

‘जिलबी’ चित्रपटाची कथा-पटकथा-संवाद मच्छिंद्र बुगडे यांचे आहेत. छायांकन गणेश उतेकर यांचे आहे. कलादिग्दर्शन कौशल सिंग यांचे असून क्रिएटिव्ह दिग्दर्शन राहुल दुबे यांचे आहे. कार्यकारी निर्माते महेश चाबुकस्वार आहेत.

Leave a Reply