आई कुठे काय करते मालिकेतील ‘या’ अभिनेत्रीने केली एक मोठी घोषणा !!

            आई कुठे काय करते या लोकप्रिय मालिकेतील एका अभिनेत्रीने एक मोठी घोषणा केली आहे. मालिकेचे कथानक, सतत येणारी नवीन वळणं यामुळे मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राला महत्त्व दिल्याने ती पात्रही लोकप्रिय झाली आहेत.

या मालिकेत विमलची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या सीमा घोगळेने मुक्तीची एक महत्त्वाची घोषणा केली आहे. प्रसिद्ध नाट्यकर्मी अनंत घोगळे यांची कन्या म्हणजेच सीमा घोगळे होय. अनंत घोगळे यांच्या स्मरणार्थ एक नाट्यस्पर्धा आयोजित केली जाते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या नाट्यस्पर्धा रद्द करण्यात आल्या होत्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by Seema Anant Ghogale (@seemaghogale)

मात्र आता सर्व सुरळीत झाल्याने या एकांकिकेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सीमाने सोशल मीडियावर एक पोस्ट करून सांगितले. अनंत घोगळे करंडक राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. या नाट्यस्पर्धेच्या माध्यमातून नवोदित कलाकरांना संधी मिळणार असल्याचेही सीमाने जाहीर केले आहे.

आई कुठे काय करते या मालिकेतील विमलवर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. तुम्हाला विमल आवडते का हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Reply