तुमच्या लाडक्या पशाबद्दल या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का ?

      स्टार प्रवाहवरील ‘सहकुटुंब सहपरिवार’ ही मलिका प्रेक्षकांचे मन जिंकून घेण्यात यशस्वी ठरली आहे. याच मालिकेतील पशाची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या आकाश नलावडेने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे स्थान निर्माण यश मिळवले आहे. पशा व अंजीचे नाते प्रेक्षकांना मनापासून भावतेय. त्या दोघांच्या नात्यातील खट्याळपणा, प्रेम, भांडण यामुळे या दोघांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे असे म्हणायला हरकत नाही.

अल्पवधीतच लोकप्रियता मिळवणारा आकाश हा मुळचा पुण्याचा आहे. त्याचा जन्मही पुण्यातच ८ सप्टेंबर १९९१ रोजी झाला. पुण्यातील महाराष्ट्र विद्यामंडळ या शाळेतून त्याचे शालेय शिक्षण पूर्ण झाले असून कावेरी महाविद्यालयातून त्याने कॉमर्स शाखेतून पदवी घेतली आहे.

मध्यमवर्गीय कुटुंबातील आकाशला अभिनय क्षेत्राची कोणतीही पार्श्वभूमी नसताना त्याने अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचे ठरवले. त्यासाठी त्याने पुण्याच्या ललित केंद्रात अभिनयाचे धडेही गिरवले आहेत.

‘सहकुटुंब सहपरिवार’ ही त्याची पहिलीच मालिका असून या मालिकेतूनच त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. तुम्हाला अंजी-पशाची जोडी आवडते का हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

 

Leave a Reply