स्वाभिमान मालिकेने घेतला प्रेक्षकांचा निरोप, पुजा बिरारी हिने केलेली खास पोस्ट चर्चेत
स्टार प्रवाह वाहिनीवरील सर्वच मालिका या चांगल्याच चर्चेत असतात. ‘आई कुठे काय करते’, ‘रंग माझा वेगळा’, ‘सुख म्हणजे काय असतं’, ‘स्वाभिमान’ या मालिका कायमच प्रेक्षकांचा चर्चेचा विषय ठरलेला असतात. छोट्या पडद्यावरील ‘स्वाभिमान’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणून ओळखली जाते. नुकताच स्वाभिमान या मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित झाला. या मालिकेतील प्रत्येक पात्रं प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिलं आहे.
या मालिकेत पल्लवी ही भूमिका प्रेक्षकांना खूप जवळची वाटली.ही भूमिका अभिनेत्री पुजा बिरारी हिने साकारली आहे. नुकतेच तिने Instagram वर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात ती म्हणते “एकवेळ पूजा ला ओ देणार नाही पण पल्लु किंवा पल्लवी या हाकेला आपसूकच माझ्या तोंडून ओ येत होतं..
“पल्लवी” ही भूमिका साकारताना खरंतर पल्लवी ने पूजाला जगायला शिकवलं..
पल्लवी मुळे खरंतर पूजाला ओळख मिळाली त्यामुळे पल्लवी ही कायम स्वरुपी आयुष्यभर माझ्यासोबत असणार आहे..
खूप काही शिकायला मिळाले आहे तिच्या कडून..आणि आयुष्यभर कदाचित पल्लु किंवा पल्लवी ह्या हाकेला मी ओ देत राहीन .
पल्लवी भास्कर शिर्सेकर पासून सुरू झालेला हा प्रवास पल्लवी शांतनू सूर्यवंशी होऊन कुटुंबाला सांभाळत, अभ्यास सांभाळत, स्त्रियांना स्वभिमनाने जगायला शिकवत आणि कुटुंबासाठी न्याय मिळवत आज इथे येऊन थांबला आहे… संपला आहे असं मी म्हणणारच नाही..
खूप खूप मजा आली आहे मागच्या दोन वर्षात मला..
आठवणींच्या वादळात सापडलेल्या माझ्या मनाच्या गलबताला जितकं मांडता येतंय त्याहून खूप अधिक सांगायचंय.. पण आता माझ्या शब्दांना विराम देते.. आणि तुम्ही बरसवलेल्या प्रेमाला घट्ट मिठी मारून आपली रजा घेते.. धन्यवाद..!!!
तिच्या या पोस्ट वर तिच्या चाहत्यांनी कमेंट करत we miss you Pallavi असं म्हटलं आहे
पल्लवी आणि शांतनूच्या हटके लव्हस्टोरीने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. . ‘स्वाभिमान’ मालिका फार कमी वेळात प्रेक्षकांपर्यंत पोहोचली.