आई कुठे काय करते मालिकेतील ‘ही’ कलाकार आहे अजूनही सिंगल
स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेमधील सर्व व्यक्तिरेखांना भरपूर लोकप्रियता मिळाली. या मालिकेत प्रत्येक व्यक्तिरेखेला महत्त्व दिल्याने कलाकरांनाही स्वतःची अशी वेगळी ओळख मिळाली. या मालिकेत दाखवण्यात आलेले अविनाश हे पात्रही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते आहे. अविनाशच्या बायकोचे म्हणजेच नीलिमाची व्यक्तिरेखा अभिनेत्री शीतल क्षीरसागर साकारत आहेत.
आपण आज शीतलविषयी जाणून घेणार आहोत. शीतल यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. नृत्याचे प्रशिक्षण घेतल्यावर त्यांनी अनेक नाट्यस्पर्धांमधून भाग घेतला. १९९९ मध्ये प्रदर्शित झालेला ‘आरंभ’ या सिनेमातून शीतल यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी ‘एक होती वादी’ या सिनेमात काम केले. या सिनेमातील त्यांच्या अभिनयाचे कौतुक तर झालेच पण त्यांच्या या सिनेमाला महाराष्ट्र शासनाचे ५३ पुरस्कारसुद्धा मिळाले आहेत. गेल्या २० वर्षांपासून मनोरंजन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या शीतल यांनी अद्याप लग्न केले नसून त्या त्यांच्या कुटुंबीयांसोबत राहतात. आयुष्य खूप सुंदर असून मी त्याचा उपभोग घेतेय असं त्या म्हणतात.
शीतल सध्या झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत सीमाच्या व्यक्तिरेखेत पाहायला मिळत असून त्या आधी ‘एक होती राजकन्या’, ‘का रे दुरावा’ या मालिकांमध्येही झळकल्या आहेत.