पारंपरिक पद्धतीने पार पडणार राज कावेरीचा लग्नसोहळा !
मुंबई २४ फेब्रुवारी, २०२३ : लग्न म्हणजे नव्या आयुष्याची सुरुवात… जन्मभराचे ऋणानुबंध. प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचा क्षण. आणि हाच क्षण आता आपल्या राज आणि कावेरीच्या आयुष्यात आला आहे. मोठ्या धुमधडाक्यात या दोघांचे लग्न होणार आहे. ज्या क्षणाची वाट राज कावेरीसोबत अख्खा महाराष्ट्र बघत होता तो क्षण आता जवळ आला आहे. राज कावेरीच्या हळूवार प्रेमाची गोष्ट प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आणि हे दोघे कधी एकत्र येणार याची उत्सुकता आपल्या सगळ्यांना लागून राहिली होती. एकीकडे स्वत:ची संस्कृती जपण्याचा ध्यास असणारी आणि परंपरेचा डोळस अभिमान बाळगणारी कावेरी तर दुसरीकडे नाविन्याची कास असणारा राजवर्धन एकेमकांना समोर आले आंणि दोघांमध्ये हळुवार प्रेम फुलत गेले. कावेरी आणि राजवर्धनच्या या गोष्टीमध्ये अनेक अनपेक्षित वळण आली, कधी गैरसमज तर कधी प्रेम तर कधी भांडणाची वादळ, कधी दुरावा… एकमेकांच्या साथीने सगळ्यांशी लढत आता तो शुभ दिवस आला आहे. मंडप सजला आहे, तोरण लागली आहेत. मुहूर्त देखील निघाला आहे, स्थळ देखील निश्चित झाले आहे. तेव्हा आपल्या राज – कावेरीच्या लग्नाला यायचं हा ! नक्की या… २६ फेब्रुवारीला दु. १ आणि संध्या ७ वा. दोन तासाचा विशेष भाग फक्त आपल्या कलर्स मराठीवर.-
राज – कावेरी यांचा विवासोहळा आनंदात पार पडणार आहे लग्नासाठी कावेरीचा खास मराठमोळा लूक असणार आहे नऊवारी, नथ, शेला, हिरवा चुडा या लुकमध्ये कावेरी खूप सुंदर दिसत आहे. दोघांचाही अस्सल मराठमोळा बाज दिसून येणार आहे. लग्न पारंपरिक पध्दतीने पार पडणार आहे. सप्तपदी, मंगलाष्टक, सुनमुख सगळ्या विधी पर पडणार आहेत. खऱ्या अर्थाने राजला कावेरीची साता जन्मासाठी साथ मिळाली आहे. इतक्या दिवसांनंतर या दोघांच्या आयुष्यात आलेला हा आनंद असाच टिकून राहो अशीच ईश्वर चरणी प्रार्थना !
रत्नमाला म्हणजेच निवेदिता सराफ यानिमित्ताने म्हणाल्या, “रत्नमालासाठी तिच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस आहे कारण याच दिवसाची वाट ती कुठेतरी बघत होती. कारण कावेरीच्या आयुष्यात येण्याने राजमध्ये खूप बदल झाले आहेत. मालिकेत रत्नमाला आणि राजचं नातं देखील दृढ झाले आहे. आता मालिकेत राज कावेरीचं लग्न होणार आहे. सेटवर अगदी आनंदी वातावरण आहे, जय्य्त तयारी सुरु झाली आहे. मोहितेंचे घर सकारात्मकतेने, आपल्या माणसांनी, नातेवाईकांनी बहरून जाणार आहे. जितका आनंद आम्हांला आहे किंबहुना त्यापेक्षा अधिक आनंद महाराष्ट्रातील तमाम जनतेला आहे कारण तेदेखील या दिवसाची वाट आतुरतेने बघत होते. तेव्हा राज – कावेरीच्या लग्नाला नक्की यायचं हे आमच्याकडून सगळयांना आग्रहाचे निमंत्रण आहे”.
राज – कावेरीच्या लग्नाला नक्की यायचं. २६ फेब्रुवारीला दु. १ आणि संध्या ७ वा. दोन तासाचा विशेष भाग फक्त आपल्या कलर्स मराठीवर.-