“मराठी लोकांना स्वार्थापोटी … “अभिनेत्री प्रार्थना बेहेरे तिच्या ‘त्या’ व्हिडिओमुळे पुन्हा होत आहे ट्रोल !!
झी मराठी वाहिनीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेमुळे अभिनेत्री प्रार्थना बेहेरे कमी कालावधीत घराघरात पोहचली. नेहा आणि यश या जोडीला प्रेक्षकांकडून खूप मिळाले होते.या मालिकेने नुकताच निरोप घेतला आहे.असे असले तरी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे नेहमीच तिच्या सोशल मीडियावर सक्रिय असलेली पाहिला मिळते. तिने टाकलेल्या बोल्ड फोटो आणि व्हिडिओ यामुळे ती अनेकवेळा ट्रोल देखील झालेली आहे.
https://www.instagram.com/reel/CocKRfQApt_/?igshid=YmMyMTA2M2Y=
यावेळी देखील असेच काही तरी घडले आहे. नुकताच तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे.त्या मध्ये ती एका Online Gaming ॲप्लिकेशनची जाहिरात करताना दिसत आहे.या पोस्ट वर तिच्या चहा त्यांनी कमेंट केल्या आहेत .
यामधील बऱ्याच कमेंट या तिच्या या पोस्टच्या विरोधात आहेत. यावर कमेंट करत एका चाहत्याने लिहिलं आहे की “काय उपयोग मराठी चित्रपट करून मराठी लोकांना स्वार्थापोटी जुगार खेळण्याची सवय लावता”
दुसऱ्या एका चाहत्याने लिहिलं आहे की जाहिरात करून तुम्ही पैसे कमवा आणि तुमच्या जाहिरातीच अनुकरण करून महाराष्ट्रातील तरुण युवा पिढीला भीक मागायला लावा हे बरोबर नाही प्रार्थनाजी” तिसऱ्या एका चाहत्याने लिहिलं आहे की तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती मॅडम चक्क जुगाराचा नाद लावताय महाराष्ट्रातील तरुणांना”
सध्या प्रार्थना बेहेरेची ही पोस्ट खूपच व्हायरल होत आहे आणि या व्हिडिओमुळे तिला ट्रोल केलं जात आहे.
अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास पवित्र रिश्ता या मालिकेतून प्रार्थना घराघरात पोहचली. आणि सध्या नेहा या पात्राने तिला अधिकच प्रसिद्धी मिळवून दिली आहे प्रार्थना बेहेरे होणे अनेक चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे.