अभिनेते अमोल कोल्हे करणार कौटुंबिक मालिकेची निर्मिती !!
अभिनेता आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार डॉ अमोल कोल्हे नेहमीच चर्चेत असतात. नुकतेच त्यांच्या शिवपुत्र संभाजी महानाट्याचे प्रयोग संभाजीनगर आणि नाशिकमध्ये झाले.या नाटकाला प्रेक्षकांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
डॉ अमोल कोल्हे यांची अभिनय, राजकारण या बरोबरीने निर्मिती शेत्रात देखील भरीव कामगिरी आहे. त्यांनी आतापर्यंत ‘स्वराज्यरक्षक संभाजी’, ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या ऐतिहासिक मालिकांची निर्मिती केली आहे. त्यांच्या या मालिकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं.आता या ऐतिहासिक मालिकांची यशस्वी निर्मिती केल्यानंतर अमोल कोल्हे आता ‘प्रेमास रंग यावे’ हया कौटुंबिक मालिकेची निर्मिती करणार आहेत.
नुकताच या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला.या मालिकेत सारिका नवाथे , अमिता कुलकर्णी, अभिजित चव्हाण आणि गौरी कुलकर्णी हे कलाकार दिसणार आहेत.ही मालिका 20 फेब्रुवारी पासून सोमवार ते शनिवार रात्री ९.३० वाजता. सन मराठीवर प्रक्षेपित होणार आहे.