मिलिंद गवळी यांनी केली मूकबधिर व्यक्तींसाठी खास पोस्ट म्हणाले अश्या…
आई कुठे काय करते ही मालिका अल्पावधीत प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे.यातील प्रत्येक पात्र प्रेक्षकांना आपलेसे वाटते. अनिरूद्ध हे पात्र अभिनेते मिलिंद गवळी हे साकारत आहेत.त्यांच्या उत्तम अभिनयाच्या जोरावर अनिरूद्ध ही त्यांची नकारात्मक भूमिका प्रेक्षकांमध्ये चांगलीच लोकप्रिय झाली आहे.
मिलिंद गवळी हे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. त्यांनी शेअर केलेल्या पोस्टला चांगलीच लोकप्रियता मिळताना दिसत आहे नुकतीच मूकबधिर व्यक्तींच्या संदर्भात त्यांनी ऐक पोस्ट केली आहे.या पोस्टची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत असताना दिसत आहे.
मिलिंद गवळी आपल्या पोस्टमध्ये म्हणतात “Mime म्हणजे मुकाभिनय करणारा कलाकार.”
काही दिवसांपूर्वी आमच्या “आई कुठे काय करते” चा यश म्हणजेच आमचा अभिषेक देशमुख @abhisheksdeshmukh जो वर्षापूर्वीच त्याच्या पत्नीसह @mekrutikadeo ठाण्यात shift झाला .
कांचन आई सोडल्या तर आम्ही सगळेच मुख्य कलाकार, ठाण्यात शिफ्ट झालो , जो काही थोडा वेळ family साठी मिळतो तो ठाण्यातल्या ठाण्यात च फिरून आम्ही सगळेच घालवतो,
तर, काही दिवसांपूर्वी अभिषेक म्हणाला की , तो त्याच्या पत्नीला घेऊन एका वेगळ्याच रेस्टॉरंटमध्ये गेला होता आणि मला म्हणाला “बाबा तुम्हाला तिथे जायला आवडेल तुम्ही नक्की जा “ आणि माझ्या पोरांनी सांगितलेलं सहसा मी टाळत नाही , त्या Restaurant नाव आहे “मदिरा अंड माईम”
आता मदिरेशी माझा काही संबंध नाही, पण माईम Mime शी नक्कीच आहे.
आणि खरच किती इंटरेस्टिंग interesting अशी जागा आहे ही . इथे सगळे मूकबधिर काम करतात . मी दिपा बरोबर तिथे गेलो आणि मला खूपच छान वाटलं .
तिथे सगळ्यांचे खूप हसतमुख चेहरे , काहीही न बोलता , गणेश याने मला विचारले “काय हवं आहे आपल्याला खाण्यासाठी “ मी त्याला म्हटलं “मदिरा सोडून काहीही दे “ तेही मी एक अक्षर न बोलता त्याला ते कळलं , तो मनसोक्तं हसला आणि त्याने छान चविष्ट बँड गार्लिक सूप Burnt Garlic Soup मला खूप प्रेमाने आणून दिलं , एकमेकांशी न बोलता आम्ही खूप गप्पा मारल्या , खूप हसलो . त्या सगळ्यांशी छान मैत्री झाली , फोटो व्हिडिओ काढून झाले, एकदम मज्जा आली.
खूप वर्षांपूर्वी दादरला संध्याकाळी सहा वाजता पोर्तुगीज चर्च जवळ चार-पाच मूकबधिर मुलं भेटायचे, मी क्लास वरून परत येताना दररोज त्यांना पाहायचो , एकदा मी त्यांच्यामध्ये सामील झालो,मग आमच्या खूप छान गप्पा व्हायच्या ,खूप चेष्टा मस्करी व्हायची , खूप हसायचो आणि ते सगळं एक अक्षरही न बोलता , एक अक्षरही न ऐकता , फक्त sign language ने, मी आजही त्ते सगळं miss करतो .
या मुलांना परवा या रेस्टॉरंट मध्ये भेटून छान वाटलं
वाटलं ज्यांनी कोणी हे रेस्टॉरंट काढलं त्याला खरंच सलाम, अशा Job Creation, ची आज गरज आहे . आपल्याकडे मूकबधिर मुलांसाठी खूप कमी Job Opportunitiesआहेत.
मदिरा अँड माईम च्या सगळ्या Staff ला माझ्या खूप खूप शुभेच्छा
Thankyou @abhisheksdeshmukh and @mekrutikadeo