“….हे भाग्य मला तमाशा Live ने दिले” “हेमांगी कवी”ची “तमाशा लाईव्ह” साठी खास पोस्ट

अभिनेत्री हेमांगी कवी सोशल मीडिया वर चांगलीच लोकप्रिय आहे. तिचे रोखठोक मत सोशल मीडियावर नेहमीच व्यक्त करत असते. ती तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांच मनोरंजन करत असते. नुकताच तिचा तमाशा लाईव्ह हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने केलेली एक खास पोस्ट सध्या चाहत्यांचे लक्ष वेधत आहे.
या पोस्टमध्ये तिने तमाशा लाईव्ह या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे काही फोटो शेअर केले आहे आणि त्याला एक भलेमोठे कॅप्शनही देखील दिले आहे. या पोस्टमध्ये ती म्हणते   “35 हुन अधिक भूमिका एकाच चित्रपटात साकारायला मिळणं हे एका कलाकारासाठी जितकं आव्हानात्मक तितकंच भाग्याचं! हे भाग्य मला दिलं तमाशा Live ने. मला वाटतं हा प्रकार भारतीय सिनेमा इतिहासात पहिल्यांदाच घडला आहे (मी चूक असेन तर चूक सुधारावी ) कुठल्याही कलाकारासाठी एक biodata बनू शकेल किंवा एखाद्या कलाकाराच्या career मधल्या सगळ्या projects मधली सगळी characters मोजली तर ती ही कमी पडतील अशी वेगवेगळी characters मला या सिनेमात करायला मिळाली. ह्या सगळ्या पात्रांमध्ये फक्त दिसणं नाही तर भाषा, देहबोली, voice modulation, वयोगट, सामाजिक स्तर या सगळ्यात वेगळेपण underline केलं गेलं. आता Box office वर चित्रपट चालला नाही ( जे आहे ते fact म्हणून पचवायला काहीच हरकत नसते ) पण या इतक्या कमाल चित्रपटाचा एक महत्वाचा भाग मी झाले याचा मला कायम अभिमान राहील. असं फार कमी चित्रपटांबद्दल एक कलाकार बोलतो!
यासाठी सर्वात आधी मी आमचे दिग्दर्शक Sanjay S Jadhav यांची ऋणी राहीन त्यांनी मला ‘हा’ नाही ‘हे’ roles offer केले.
दुसरे आमचे सहाय्यक दिग्दर्शक Yogesh Phulphagar यांचे आभार ज्यांनी या सगळ्या भूमिका पार पाडण्यास मला खूप मदत केली.
तिसरी आमची वेशभुषाकार sayali soman जिने खूप कमी वेळात आम्ही character नुसार आयत्या वेळेला वाट्टेल ती मागणी करायचो costumes accessories ची आणि ती ते उपलब्ध करून द्यायची!
चौथी मी …. make up आणि hair styling माझं होतं so मला ही थोडी शाबासकी! Hehe ☺️
बाकी चित्रपट जेव्हा ott वर येईल तेव्हा नक्की पहा अशी मी अजूनही विनंती करेन कारण एका खूप चांगल्या विषयाचा सिनेमा आहे हा. बातम्या, राजकारण, trp ची चढाओढ, त्यात होरपळून निघणारे आपण सगळे, एका मुलीची, तिच्या बापाची, घरच्यांची गोष्ट आहे जी आपण सगळ्यांनी मोठ्या पडद्यावर miss केली. छोट्या पडदयावर मात्र miss करू नका!
#तमाशाLive #TamashaLive
त. टी. : खरंतर हे सगळं दुसऱ्या कुणीतरी लिहिणं जास्त रास्त ठरलं असतं पण हा चित्रपट छान छान लिहिणाऱ्यांपैकी कुणीच पाहिला नाही म्हणून म्हटलं आपणच लिहावं”

या चित्रपटात हिमांगी कवी हिने ३५ पेक्षा अधिक भूमिका साकारल्या आहेत. तमाशा लाईव्ह हा चित्रपट गेल्या १५ जुलै रोजी प्रदर्शित झाला आहे. परंतु हा चित्रपट काझी खास कमाई बॉक्स ऑफिस वर करू शकला नाही.

Leave a Reply