प्रथमेश परबच्या ‘या’ सिनेमाचा धमाल ट्रेलर तुम्ही पाहिलात का ? 
आपल्या विनोदाच्या अचूक टाईमिंगने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या प्रथमेश परबचा एक नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘एक नंबर…सुपर’ असे या सिनेमाचे नाव असून या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. मिलिंद कवडे यांनी सिनेमाची कथा-पटकथा लिहिली असून दिग्दर्शनही त्यांनीच केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prathamesh Parab (@prathameshparab)

प्रथमेशसोबतच या सिनेमात गणेश यादव, निशा परुळेकर, आयली घिया, अभिलाषा पाटील, ऋषिकेश धामापूरकर, अक्षता पाडगावकर, प्रणाली संघमित्रा डावरे, सुमित भोक्से, सुनील मगरे, हरीश थोरात, आकाश कोळी हे कलाकार सिनेमात पाहायला मिळणार आहेत. महेश शिवाजी धुमाळ, जितेंद्र शिवाजी धुमाळ आणि मिलिंद कवडे यांनी धुमाळ प्रोडक्शन आणि आऊट ऑफ द बॉक्स फिल्म्सच्या सहयोगानं केली आहे. प्रथमेशचा हा सिनेमा प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करण्यात यशस्वी ठरेल.

Leave a Reply