फ्रायडे रिलीज : येत्या शुक्रवारी मनोरंजनाचा आस्वाद घ्या ‘ह्या’ तीन सिनेमांसह !
येत्या शुक्रवारी म्हणजेच २५ फेब्रुवारीला मराठी सिनेसृष्टीत तीन सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. अंकुश चौधरी व प्राजक्ता माळी यांची प्रमुख भूमिका असलेला ‘लकडाऊन बी पॉझिटिव्ह’ तर सुधीर गाडगीळ, मिलिंद शिंदे, समीर धर्माधिकारी, स्मिता शेवाळे यांचा ‘चाबूक’ हे सिनेमे प्रदर्शित होणार आहेत.
या दोन सिनेमांसोबतच वैभव तत्त्ववादी, सई ताम्हणकर, अमृता खानविलकर यांचा ‘पॉंडिचेरी’ हा सिनेमाही प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘पॉंडिचेरी’ सिनेमाचे दिग्दर्शन सचिन कुंडलकर यांनी केले आहे तर संतोष रामदास मांजरेकर दिग्दर्शित ‘लकडाऊन बी पॉझिटिव्ह’ सिनेमात पंधरा नावाजलेले कलाकार एकत्रित पाहायला मिळणार आहेत.
मधुर भांडारकर यांचे बंधू कल्पेश भांडारकर यांनी ‘चाबूक’ सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.
या तीन सिनेमांपैकी तुम्ही कोणता सिनेमा पाहायला जाणार हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.