Shilpa Shirodkar Covid PositiveShilpa Shirodkar Covid Positive

अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाची लागण,पोस्ट शेअर करत दिली माहिती ( Shilpa Shirodkar Covid Positive )
आशियाई देशात पुन्हा एकदा कोरोनाचा फैलाव होत असल्यामुळे सर्वत आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. मुंबई मधील केईम रुग्णालयात दोन कोरोना बाधितांचा मृत्यू देखील झाला आहे.

अश्यातच मनोरंजन विश्वातून देखील एक बातमी समोर येत आहे. अभिनेत्री शिल्पा शिरोडकर हिचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. याबाबतची माहिती तिने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली आहे. अभिनेत्री शिल्पा शिरोडकर हिने इंस्टाग्राम वर पोस्ट शेअर तिच्या चाहत्यांना ही माहिती दिली आहे. तिने केलेल्या पोस्टमध्ये तिने लिहले आहे की ,”नमस्कार मित्रांनो माझा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी सर्वाना मास्क लावण्याचे तसंच काळजी घेण्याचे आव्हान करते” ( Shilpa Shirodkar Tests Covid Positive)

अभिनेत्री शिल्पा शिरोडकर हिच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी तसेच मनोरंजन विश्वातील तिच्या सहकाऱ्यांनी तिला काळजी घेण्यास सांगितले आहे. शिल्पा शिरोडकर आपल्याला काही दिवसांपूर्वी बिग बॉस १८ मध्ये दिसली होती. ( Big Boss 18 fame Shilpa Shirodakar Tests Covid Positive)

Leave a Reply