गायक अभिजित सावंत लग्नानंतर Tinder App वापरायचा,याबाबत खुलासा करत म्हणाला, हे माझ्या पत्नीला माहित नव्हतं..
गायक अभिजित सावंत हा इंडियन आयडल या रियालिटी शो च्या पहिल्या सिजनपासूनच चांगला चर्चेत आहेत. अभिजित नेहमीच वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असतो नुकतीच अभिजित सावंत याने एक मुलाखत दिली आणि या मध्ये त्याने त्याच्या खाजगी एक आयुष्याबद्दल एक मोठा खुलासा केला आहे.
नेमकं काय म्हणाला अभिजित सावंत ?
अभिजित सावंत याने नुकतीच “हिंदी रश” यांना एक मुलाखत दिली त्यात तो म्हणाला “मला प्रत्येक गोष्टींमध्ये फार उत्सुकता असते. मी माझ्या मित्रांसोबत अमेरिकेत होतो.त्यावेळी मला माझ्या मित्राने टिंडर या डेटिंग अँप बद्दल सांगितले. त्याने सांगितल्यानंतर मी त्या अँप वर माझी प्रोफाइल देखील क्रिएट केली. पण मी ते अँप जास्त वापरत नव्हतो. केव्हातरी मी त्या अँप वर जायचो. तिथे कश्या प्रकारे गोष्टी घडतात ते पाहत होतो. मी त्या अँप वर माझ्या नावानेच माझं प्रोफाइल तयार केलं होतं. मी टिंडर अँप वापरतोय हे माझ्या पत्नीला माहीत नव्हतं” ( Abhijit Sawant’s big statement about using the dating app Tinder )
हेही वाचा :- “माझ्या वडिलांनी दुसरं लग्न केलं त्यानंतर..” हृता दुर्गुळे हिच्या सासुने व्यक्त केली खंत
पुढे अभिजित म्हणाला “जरीही मी डेटिंग अँप वर माझ्या नावाने अकाऊंट तयार केलं असलं तरीही मी कोणाला कधी भेटलो नाही किंवा कोणाला डेट केलं. जर कोणत्या प्रोफाईलसोबत माझं प्रोफाईल मॅच झालं तरंच मी बोलायचो. मला लोकांसोबत बोलायला फार आवडतं. मुलींसोबत आपण कोणत्याही विषयावर गप्पा मारु शकता. माझ्या फ्रेंडलिस्टमध्ये दोन- तीन जणं असे फ्रेंड्स होते की, ते जे माझ्यासोबत खूप चांगले बोलायचे. द्वीटरवरही आलं होतं की मी टिंडर वापरतो. पण माझ्या पत्नीला माहिती नव्हतं की, मी टिंडर अँप वापरतो. जर तिला कळालं तर ते चांगलं वाटणार नाही.” असं म्हणत अभिजित सावंतने हा मोठा खुलासा केला आहे. शिवाय त्याने मुलाखतीत, मी ते अँप उत्सुकता म्हणून वापरायचो. असही म्हटले आहे. ( abhijeet sawant life story )
कोण आहे अभिजित सावंत याची पत्नी ? ( Who is Abhijit Sawant’s wife ? )
गायक अभिजित सावंत याने शिल्पा एडवणकर यांच्याशी २००७ मध्ये लव्हमॅरेज केले होते. त्यांना दोन मुली देखील आहेत. शिल्पा यांचा अस्मी या नावाने स्वतःचा केकचा बिजनेस आहे. त्यांच्या मुलींची नावे समीरा आणि आहाना अशी आहेत.
तसेच अभिजीत सावंत बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात स्पर्धक म्हणून देखील सहभागी झाला होता. अभिजित सावंत अनेकदा त्याच्या पत्नी सोबतचे फोटो सोशल मीडियावर टाकताना दिसतो. त्यामध्ये त्या दोघांमध्ये असलेला गॉड बॉण्ड आपल्याला पाहिला मिळतो.( Abhijeet Sawant Love Story )