आईच्या जुन्या साड्यांचा ‘या’ अभिनेत्याने केला असा वापर !
आपल्या अभिनयाने व उत्तम विनोद कौशल्याने पृथ्वीक प्रताप या अभिनेत्याने मराठी सिनेसृष्टीमध्ये स्वतःचा ठसा उमटवला आहे. सध्या पृथ्वीक प्रताप एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहेत. पृथ्वीकने आपल्या आईच्या जुन्या साड्यांचा वापर करून पारंपरिक वेशातील कुर्ता व पायजमा शिवला आहे. या संदर्भातील एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत याविषयीची माहिती दिली आहे.
View this post on Instagram
मेहंदी रंगाची पृथ्वीकच्या आईची साडी असून त्यावर त्याने शिवलेला पारंपरिक वेष त्याच्यावर खुलून दिसतो आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीत साड्यांचा वापर करून नव्या अंदाजातील वेष शिवले जातात. मात्र आता हा ट्रेंड पृथ्वीकने मराठी सिनेसृष्टीत सुरु केल्याचे म्हणायला हरकत नाही. पृथ्वीकने शेअर केलेल्या ‘या’ फोटोवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.