तु माझ्या बरोबर लग्न करणार..प्राजक्ता माळीने स्पष्ट सांगून टाकले की.. ( Prajakta Mali On Getting Married )
अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्या वक्तव्याची नेहमीच चर्चा होत असते. असेच एक तिचे वक्तव्य सध्या चर्चेत आहेत. नुकतेच अभिनेत्री प्राजक्ता मला हिने इंस्टाग्राम स्टोरी वरून Ask Me Anything हे सेशन घेतले होते. तेव्हा तिला एका चाहत्याने प्राजक्ता हिला लग्नाविषयी प्रश्न विचारला. तेव्हा तिने त्याला जे उत्तर तिले याची सध्या सर्वत्र चर्चा आहे.
प्राजक्ता माळी हिच्या Ask Me Anything ह्या सेशन मध्ये एका चाहत्याने प्रश्न विचारला की “तु माझ्याबरोबर लग्न करणार का ,तुझ्यामुळे मी पण लग्न केलं नाही Love You. या प्रश्नावर प्राजक्ता माळी हिने यावर उत्तर देत म्हणाली “माझं काही खरं नाही तुम्ही करून टाका (सगळेच जे थांबलेत)(जनहित मे जारी )(Spread the word )
प्राजक्ताला आणखी एका नेटकऱ्याने मॅम तुमचा क्रश आहे का ? असा प्रश्न विचारला त्यावर ती म्हणाली आधी मला नानी आवडायचा पण आता मला अभिनेता जयम रवी आवडतो. हे दोघेही दाक्षिणात्य अभिनेते आहेत आणि या सगळयात रणवीर तर आवडतोच.
हेही वाचा :- प्राजक्ता माळीचा ‘फुलवंती’ चित्रपट OTT वर दाखल !!
अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तिची पहिली निर्मिती असलेला फुलवंती हा चित्रपट नुकताच सिनेमा गृहात येऊन गेला. सध्या ती महाराष्ट्राची हास्यजत्रा मध्ये अँकरिंग करण्यात व्यस्त आहेत.