तुमचे पैसे वाया घालू नको.. कोकण हार्टेड गर्ल हिने केले पुष्पा २ न पाहण्याचे प्रेक्षकांना आव्हान !! ( Ankita Walawalkar react On Pushpa 2)
सध्या संपूर्ण बॉक्स ऑफिसवर फक्त पुष्पा २ ( Pushpa 2 Movie ) ची चर्चा आहे. अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun ) याचा पुष्पा २ हा चित्रपट नुकताच चित्रपटगृहात दाखल झाला आहे. या चित्रपटाने फक्त तीन दिवसात जवळपास ३०० कोटी ( Pushpa Box Office Collection ) रुपयांचा टप्पा पार केला आहे. अश्यातच कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच अंकिता प्रभू- वालावलकर हिने मात्र चित्रपट न पाहण्याचे प्रेक्षकांना आव्हान केले आहे.
अंकिता हिने नुकताच पुष्पा २ हा चित्रपट पाहिला. चित्रपट पाहिल्यानंतर तिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट केली आहे त्यात तिने अभिनयाला १०० पैकी १०० मार्क दिले आहे. पण तरीही चित्रपट न पाहण्याचे आव्हान तिने प्रेक्षकांना केले आहे.
नेमकी अंकिता प्रभू- वालावलकर हिची पोस्ट आहे तरी काय ? ( Ankita Walawalkar react On Pushpa 2)
अंकिता हिने इंस्टाग्राम स्टोरीवर पुष्पा २ चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे आणि म्हंटले आहे की, अभिनय १०० पैकी १०० पण कथा मात्र शून्य.. पुष्पाचा पहिला भाग दुसऱ्या भागापेक्षा चांगला होता. प्लिज तुमचे पैसे वाया घालवू नका… मला असं वाटतं की मनोरंजन हे एक प्रभावी माध्यम आहे आणि जे सिनेमे प्रेक्षकांपर्यंत खुप मोठ्या प्रमाणात पोहचतात ते चांगलेच असायला हवे.
दरम्यान मीडिया रिपोर्ट नुसार या चित्रपटाचे बजेट हे ५०० करोड रुपये आहे आणि ज्या प्रकारे चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाळ घालत आहे त्याचा विचार करता या विकेंड मध्ये सर्व पैसे वसूल करेल असे बोलले जात आहे. पुष्पा २ चित्रपटात अभिनेता अल्लू अर्जुन याच्या सोबत रश्मीका मंदाना आणि फहद फासिल याच्या देखील महत्वाच्या भुमिका आहेत. महत्वाचे म्हणजे या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जन मध्ये मराठी अभिनेता श्रेयस तळपदे याने अल्लू अर्जुन याला आवाज दिला आहे.