Laxmi Niwas Marathi Serial 2024Laxmi Niwas Marathi Serial 2024

‘मन धागा धागा जोडते नवा’ फेम अभिनेत्रीची झी मराठीवर वर्णी ( Laxmi Niwas Marathi Serial 2024 )

गेल्या काही महिन्यांपासून सर्वच मराठी वाहिनीवर जुन्या मालिका बंद होवून नव्या मालिका दाखल होतं आहेत.झी मराठी वर देखील येत्या काळात बऱ्याच नविन मालिका दाखल होणार आहे.( Zee Marathi New Serial 2024 )

झी मराठीवर काही दिवसापूर्वी लक्ष्मी निवास या नव्या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला होता.त्या प्रोमो मध्ये अभिनेता तुषार दळवी आणि हर्षदा खानविलकर यांचे चेहरे दाखविले होते. त्या प्रोमो वरून ही कौटुंबिक मालिका असणार हे स्पष्ट झालं होतं त्याच बरोबर यात कलाकारांचा मोठा फोजफाटा असणार हे देखिल नक्की होत.( Laxmi Niwas Marathi Serial 2024 )

Zee Marathi New Serial 2024
Zee Marathi New Serial 2024

नुकताच लक्ष्मी निवास या मालिकेचा आणखी एक प्रोमो प्रदर्शित झाला आहे त्यात इतर अनेक कलाकारांचे चेहरे समोर आले आहेत.या प्रोमो मध्ये लक्ष्मी आणि निवास यांच्या मुलीचे लग्न झाले आहे असे दाखवले आहे. त्यांच्या मुलीच्या भूमिकेत अभिनेत्री अक्षया देवधर पाहिला मिळतं आहे. अक्षया सोबत या प्रोमो मध्ये स्टार प्रवाह वरील लोकप्रिय अभिनेत्री दिव्या पुगावकर दिसत आहे.( Laxmi Niwas Marathi Serial Cast)

हेही वाचा :- अभिनेत्री ‘मृणाल दुसानिस’ने सुरू केला नवा व्यवसाय ( Mrunal Dusanis Start New Business)

अभिनेत्री दिव्या पुगावकर हिला आपण या पुर्वी स्टार प्रवाह वर ‘मुलगी झाली हो’ आणि ‘मन धागा धागा जोडते’ नवा या मालिकेत पाहिले होते. दिव्या हिने तिच्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळंस्थान निर्माण केलं होतं. (Divya Pugaonkar New Serial)

स्वत: च्या घराचं स्वप्न बघणाऱ्या प्रत्येकाची गोष्ट असा या मालिकेचा आशय असल्याचं कळतंय. ‘झी मराठी’ वाहिनीवरील ही मालिका ‘लक्ष्मी निवास’, ही ‘झी कन्नडा’ची मालिका ‘लक्ष्मी निवासा’चा मराठी रिमेक आहे. सध्या या नव्या मालिकेची सर्वत्र चर्चा रंगलेली आहे. ( Akshya Devdhar New Serial)

Leave a Reply