महेश मांजेरकर यांनी ‘बिग बॉस’ हा कार्यक्रम अर्ध्यातच सोडून जाण्यामागचे ‘हे’ कारण !
छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस’ हा सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रम आता शेवटच्या टप्प्याकडे आला आहे. येत्या काही दिवसांमध्येच या कार्यक्रमाचा ग्रँड फिनाले सोहळा पाहता येणार आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या व दुसऱ्या पर्वाचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर यांनी केले होते. आतापर्यंत तिसऱ्या पर्वाचे सूत्रसंचालनही महेश मांजरेकरच करत होते. मात्र आता यानंतर त्यांच्या जागी अभिनेता सिद्धार्थ जाधव या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत. गेल्या आठवड्यात बिग बॉसची चावडी रंगली. मात्र ती महेश मांजरेकर यांच्याशिवाय ! त्यामुळे सिनेविश्वात अनेक चर्चांना ऊत आला होता.
कार्यक्रम शेवटाकडे आलेला असतानाच त्यांनी मधेच कार्यक्रम का सोडला असा प्रश्नही प्रेक्षकांना भेडसावत होता. मात्र खुद्द महेश मांजरेकरांनीच या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते हा कार्यक्रम अर्ध्यात सोडत आहेत. त्यांची तब्येत सध्या चांगली नसल्यामुळे त्यांना हा कार्यक्रम सोडावा लागला आहे. बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वाचा विजेता कोण ठरेल याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. मात्र त्याचबरोबर महेश मांजरेकर यानंतर कार्यक्रमात दिसणार नाहीत यांची खंत प्रेक्षकांनी व्यक्त