अभिनेत्री अमृता खानविलकर हिने दाखवली नव्या आलिशान घराची खास झलक (Amruta Khanwilkar bought a new house)
अभिनेत्री अमृता खानविलकर ही मराठी मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.अमृताने मराठी, हिंदी चित्रपट तसेच वेब सीरिज यांच्या माध्यमातून आपला एक चाहता वर्ग निर्माण केला आहे. अमृता खानविलकर ही तिच्या सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
हेही वाचा :– ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री रूपाली भोसले हिने घेतली नविन गाडी
नुकतेच अमृता खानविलकर हिने दिवाळी निमित्त तिच्या चाहत्यासोबत एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. अमृता हिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून एक व्हिडीओ शेअर केला आहे त्यात तिने मुंबई मध्ये घेतलेल्या नवीन आलिशान घराची खास झलक दाखवली आहे.
हेही वाचा :– मारा किंवा मरा हा एकच रुल…. थरकाप उडवणारा रानटी चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला
अमृता खानविलकर हिने तिच्या या नविन घरासाठी कॅप्शन मध्ये एक सुंदर मेसेज पण लिहिला आहे.तिने तिच्या या नविन घराचे नाव एकम असे ठेवले आहे. अमृता चे घर 22 व्या मजल्यावर असून तो 3BHK फ्लॅट आहे. या घराचे काम अंतिम टप्प्यात आहे आणि लवकरच अमृता तिने राहायला जाणार आहे.
अमृता खानविलकर हिने व्हिडीओ शेअर करतं असं कॅप्शन दिलं आहे की ” चला भेट झालीच आपली
कधी काळी दूर कुठेतरी तुझं स्वप्न पाहिलं होतं,
आणि ते पूर्ण करण्याचा प्रयत्न रोज सुरू होता.
तर हि आपली पहिली दिवाळी….
तुला खूप गोष्टी सांगायच्या आहेत,
मला काय आवडतं, काय नाही,
मनातलं गुपित, शांततेतलं ….सारं काही
हळूहळू तुला कळेलच 🤗
तुलाही मला खूप काही सांगायचं असेल…
माझी पूर्ण तयारी आहे.
तू अजून हळूहळू आकार घेतोयस,
तुझ्या कानाकोपऱ्यात मी माझं सगळं जग बसवायचा प्रयत्न करतेय.
तू हि अगदी माझ्या हो ला हो म्हणतोयस ….
आवडतंय मला …..
लवकरच भेटू
नव्या कोऱ्या भिंतींसह
नव्या आठवणी बनवण्यासाठी
नवं आयुष्य उलगडण्यासाठी- Happy Diwali 🪔
On the occasion of #laxmipujan and the start of my birthday month #november 🤗 m absolutely humbled and thrilled to share news of my new home – “EKAM “ which means beginning and it truly is in every sense
coming soon by @studio_swap
It truly is a very happy Diwali for me”
अमृता खानविलकर हिने शेअर केलेल्या या व्हिडीओ वर अनेक कलाकारांनी तसेच तिच्या चाहत्यांनी देखील कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा :- अवघ्या 22 व्या वर्षी अभिनेत्रीची मोठी झेप, दिवाळीची केली ही मोठी खरेदी