सिंगम अगेन पाहावा की पाहू नये ? – Singham Again Movie Review 2024
(Singham Again Movie Review )
बॉलीवूड अभिनेता अजय देवगन याचा सिंघम हा चित्रपट 2010 सरी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता या चित्रपटाने त्यावेळी बॉक्स ऑफिसवर छप्पर फार कमाई केली होती चित्रपट येऊन इतकी वर्ष झाली तरी देखील आजही हा चित्रपट प्रेक्षकांच्या लक्षात राहिला आहे. सिंघम या चित्रपटात अभिनेत्री काजल अग्रवाल ही मुख्य भूमिकेत दिसली होती. तसेच या चित्रपटातील गाणी देखील प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे .या चित्रपटानंतर चित्रपटाचे तीन भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले असून सर्व भाग हिट झालेले आहेत .अशातच आता सिंघम या चित्रपटाचा अजून एक भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
सिंघम अगेन चित्रपटाच्या गोष्टीविषयी सांगायचे झाल्यास यामध्ये बाजीराव सिंघम हा कश्मीरमध्ये तैनात असतो आणि तिथे तो त्याच्यावर हल्ला करण्यासाठी आलेल्या अतिरेकी ओमर हाफिजला पकडतो. त्यावेळी ओमर त्याला सांगतो की कोणी तरी माझ्या पेक्षा डेंजर असून तो येणार आहे नंतर आपण चित्रपटात पाहतो की ओमररचा नातू डेंजर लंका हा अवनीचे अपहरण करून तिला श्रीलंकेला नेतो.मग सिंघम आणि त्याची सर्व पोलीस सेना डेंजर लंका विरुद्ध कसे लढतात अशी या चित्रपटाची कथा आहे.(Singham Again Movie Review )
एकंदर चित्रपटाविषयी बोलायचं झाल्यास सिंघम सिरीज मधील इतर चित्रपटाच्या तुलनेत हा चित्रपट एवढा प्रभावी वाटत नाही. काही दृश्यांचा जुन्या चित्रपटांशी अचूक संबंध मात्र जोडण्यात आला आहे. सिंघम च्या मनात येते आणि अवनीला सोडवायला त्याचा प्रत्येक शिष्य तिथे कसा पोहचतो हे आपल्याला प्रेक्षक म्हणून समजत नाही. या सर्वांमध्ये कॉमेडी करत रणवीर सिंग मात्र भाव खाऊ जाताना आपल्याला दिसतो. या चित्रपटाचे गीत आणि संगीत मात्र सामान्य आहेत.
कलाकारांच्या अभिनयाविषयी बोलत झाल्यास या चित्रपटात मोठी स्टार कास्ट असल्याने अजय देवगन च्या वाटेला मात्र फार कमी काम आले आहे असे दिसते. अजय देवगन याने सिंघम हे कॅरेक्टर केले आहे रणवीर सिंग याची कॉमेडी प्रेक्षक एन्जॉय करतात. करीना कपूर हिने अवनी हे पात्र देखील चांगलं रंगवल आहे. दीपिका पदुकोण ही या चित्रपटात लेडी सिंघम म्हणून दाखवलेली आहे. अर्जुन कपूर या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसतो.(Singham Again Movie Review )
त्याचा लुक पाहिल्यावर बऱ्याच जणांना ॲनिमल चित्रपटातील बॉबी देवल याचा लुक आठवल्याशिवाय राहणार नाही. या चित्रपटात अर्जुन कपूर यांनी डेंजर लंका हे पात्र साकारले आहे आणि त्याने ते अतिशय उत्तम पद्धतीने साकारलेले दिसत आहे.
हेही वाचा :- मारा किंवा मरा हा एकच रुल…. थरकाप उडवणारा रानटी चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला
अक्षय कुमारची देखील या चित्रपटात छोटीशी भूमिका आहे आणि सर्वात शेवटी बॉलीवूड चा लाडका अभिनेता सलमान खान जुबुल पांडेच्या रूपात येतो.
हेही वाचा :- टिकटॉक स्टार मिनाहिल मलिक हिचा प्रायव्हेट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
एकंदर चित्रपटाविषयी सांगायचं झाल्यास हा चित्रपट एकदा आपण नक्कीच पाहू शकतो.