अवघ्या 22 व्या वर्षी अभिनेत्रीची मोठी झेप, दिवाळीची केली ही मोठी खरेदी ( Anushka Sen New Home )
हिंदी मालिका विश्वातील एक लोकप्रिय चेहरा म्हणजे अभिनेत्री अनुष्का सेन ( Anushka Sen ). अनुष्का हिने कमी कालावधी मध्ये आपल वेगळं असं स्थान ह्या मालिका विश्वात निर्माण केलं आहे
दिवाळीच्या निमित्ताने अनेक मराठी आणि हिंदी मालिकेतील कलाकार नवीन वस्तूची खरेदी करताना दिसतातl
अनुष्का सेन हिने देखील दिवाळीचा हा मुहुर्त साधला आहे.अनुष्का हिने मुंबई मध्ये स्वतःचे असे हक्काचे घर घेतले आहे. दिवाळीच्या शुभ मुहुर्तावर तिने या नवीन घरात प्रवेश केला आहे.
हेही वाचा :- टिकटॉक स्टार मिनाहिल मलिक हिचा प्रायव्हेट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
अनुष्का सेन हिने तिच्या या नवीन घराचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत तिच्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. तिने तिच्या या पोस्ट वर तिने गृहप्रवेश! एक नवी सुरूवात, नवीन घर तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. असे कॅप्शन दिले आहे.
अवघ्या 22 वर्षी अनुष्का सेन हिने मुंबई मध्ये स्वतःचे घर घेतल्यामुळे तीच्या चाहत्यांकडून कमेंट मधून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
अभिनेत्री अनुष्का सेन हिच्या मनोरंजन विश्वातील कामाबद्दल बोलायचे झाल्यास तिने बालवीर, झासी की रानी या हिंदी मालिकेत काम केले आहे तसेच तीने खतरों के खिलाडी सीझन 11 मध्ये देखील भाग घेतला होता.