‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रताप अडकला लग्नबंधनात, पण लग्न मात्र केले साधेपणाने
महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम महाराष्ट्रातील घरोघरी पाहिला जातो. या शोमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कलाकाराने त्याचा असा स्वतःचा एक चाहतावर्ग निर्माण केला आहे. गेल्या काही काळात मनोरंजन क्षेत्रातील बरेच कलाकार लग्न करताना दिसत आहेत.
त्यातच आता अजून एका कलाकाराची भर पडली आहे. हास्य जत्रेच्या माध्यमातून घराघरात पोहचलेला अभिनेता पृथ्वीक प्रताप हा नुकताच लग्न बंधनात अडकला आहे.
लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो त्यामुळे बरेच जण हा सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा करताना आपल्याला दिसतात परंतु पृथ्वीक प्रताप हा त्याला अपवाद ठरला आहे .त्याने हा त्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा क्षण अत्यंत साध्या पद्धतीने साजरा केला आहे .
त्याने कोणालाही लग्नाबद्दल कल्पना न देता आज सरळ आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरून लग्नाचे फोटो पोस्ट करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.
महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम अभिनेता पृथ्वीक प्रताप हा त्याची प्रेयसी प्राजक्ता वायकुळ हिच्याशी लग्न बंधनात अडकला आहे. अगदी साध्या पद्धतीने हा लग्न सोहळा संपन्न झाला.
लग्न सोहळा साधेपणाने करण्यामागचे कारण जेव्हा पृथ्वीक प्रताप याला विचारले तेव्हा तो म्हणाला “मला आधीपासूनच हा क्षण अगदी साध्या पद्धतीने घरच्या सोबतीने साजरा करायचा होता आणि लग्नाचा सगळा खर्च आम्ही दोघे एका सामाजिक कारणासाठी वापरणार आहोत.
आम्ही दोन मुलांच्या प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी घेत आहोत. आमच्या लग्नाचा खर्च हा आम्ही या मुलांच्या शैक्षणिक खर्चासाठी करणार आहोत. खरंतर असं काही करून कोणाचं तरी आयुष्य अजून सुंदर बनवता येतय यातच सगळं आलं आणि आमच्या लग्नाचं हेच बेस्ट गिफ्ट आहे असं आम्हाला वाटतं.
दरम्यान पृथ्वीक प्रताप यांच्या या कृतीच सोशल मीडियावर खूपच कौतुक होताना दिसत आहे. त्याच्या या लग्नाच्या फोटोवर त्याच्या चाहत्यांकडून आणि मराठी मनोरंजन विश्वातील कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे .आमच्याकडून देखील पृथ्वीक प्रताप यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.