अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी नवऱ्याला दिलं सर्वात मोठं गिफ्ट

अभिनेत्री ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर ही मराठी मनोरंजन विश्वातील कायमच चर्चेत राहणारी जोडी आहे. नाटक, चित्रपट आणि मालिका या तिन्ही माध्यमांतून या जोडीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.त्यांच्या कामाच्या व्यतिरिक्त ही जोडी सोशल मीडियावर देखील प्रचंड चर्चेत असलेली पाहिला मिळते.

 

विशेष म्हणजे त्यांचे डान्सचे रिल हे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. या वयात त्यांचा हा उत्साह पाहून नेटकरी नेहमीचे त्यांच्या डान्सचे भरभरून कौतुक करताना पाहिला मिळते.

अभिनेत्री ऐश्वर्या नारकर ह्या नेहमीच इंस्टाग्राम द्वारे त्यांच्या चाहत्यांच्या संपर्कात असतात. ज्या प्रमाणे त्यांच्या डान्स चे कौतुक होते तसेच त्यांच्या फिटनेसचे देखील कौतुक होत असताना दिसते.
अश्यातच अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून एक व्हिडीओ शेअर केला आहे त्या व्हिडीओला त्यांनी कॅप्शन दिले आहे ..

घर…. अविच्या नावावरचं पाहिलं घर!!!सतत दुसऱ्यांची स्वप्न पूर्ण करण्याचा विचार !! राहत्या घरावर पण माझंच नाव.!..अगदी घरातल्या ताट – वाटिवर सुध्दा!!!
आज खूप छान वाटतंय! तुझी न बाळगलेली सर्व स्वप्न पूर्ण होवोत!!!
happy home♥️♥️…

अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी शेअर केलेल्या व्हिडिओ मध्ये त्यांनी त्यांच्या नवीन घराची झलक देखील चाहत्यांना दाखवली आहे. त्याच्या या पोस्ट वर कमेंट मध्ये सर्वांनी त्याचं अभिनंदन केलं आहे.

अभिनेता अविनाश नारकर यांनी देखील ऐश्वर्या नारकर यांच्या पोस्ट वर कमेंट करत म्हंटले आहे की “तुझी खंबिर साथ… आणि तु घट्ट पकडलेला हात… यापलिकडे खरं तर काहीही नकोय…. आणि खरं सांगू… तुझ्या नवापाठोपाठ माझं नाव येतं ही माझ्यासाठी कायम आभाळ ठेंगणं करणारी गोष्ट आहे Babbu…..!! Love & Respect YOU forever….!!

Leave a Reply