“तू ही रे माझा मितवा” फेम अभिनेत्रीचे नाटकाच्या चालू प्रयोगात मिसकॅरेज
Surabhi Bhave Talks about Her Miscarriage : अभिनेत्री सुरभी भावे ही एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे. तिने स्वामिनी , भाग्य दिले तू मला अश्या मालिकेमध्ये उत्तम काम करत आपली वेगळी अशी ओळख बनवली आहे. सध्या ती स्टार प्रवाह वरील तू ही रे माझा मितवा या मालिकेत वल्लरी हे निगेटिव्ह पात्र साकारत आहे.
सुरभी भावे नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत संपर्कात असते. सुरभी हिने नुकतीच मराठी मनोरंजन विश्व या आमच्या युट्युब चॅनलला मुलाखत दिली त्यामध्ये तिने तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टींवर विचार मांडले . तिने या मुलाखतीमध्ये तिचे एका नाटकाच्या प्रयोगादरम्यान झालेले मिसकॅरेज या विषयी सांगितले आहे.
नेमकं काय घडलं सुरभी भावे सोबत ? ( Surabhi Bhave Miscarriage )
या मुलाखतीमध्ये त्या प्रसंगाबद्दल सांगताना सुरभी भावे म्हणाली की ,””सान्वी नंतर मी पुन्हा प्रेग्नंट राहिले होते. तेव्हा माझा नाटकाचा प्रयोग सुरु होता आणि चालू प्रयोगात माझ मिसकॅरेज झाल. पण त्याही वेळेला मी कुठेही थांबले नाही. ना त्याचा कुठे बाऊ केला. त्यावेळी माझं असं म्हणणं होतं की, जे झालं ते झालं, पण प्रयोग थांबवून काही उपयोग नव्हता. तेव्हा देखील माझ्या नाटकातल्या सगळ्या सहकलाकारांनी मला खूप सपोर्ट केला. ‘सागरा प्राण तळमळला’ नावाचं ते नाटक होतं.” असं म्हणत तिने तिच्या भावना व्यक्त केल्या.
अभिनेत्री सुरभी भावे हिने नाटक आणि मालिका सोबत चित्रपटामध्ये देखील काम केले आहे. पावनखिंड , चंद्रमुखी आणि ही अनोखी गाठ असे अनेक मराठी चित्रपट देखील सुरभी भावे यांनी केले आहे. सध्या तू ही रे माझा मितवा या मालिकेतील वल्लरी या भूमिकेला प्रेक्षकांकडून खुप प्रेम मिळत आहे. Surabhi Bhave Talks about Her Miscarriage