Premachi Goshta Actress AccidentPremachi Goshta Actress Accident

स्टार प्रवाह महासंगम शूट पडलं महागात, प्रेमाची गोष्ट फेम मुक्ताचा अपघात, थोडक्यात बचावली पण…

Premachi Goshta Actress Accident :- “प्रेमाची गोष्ट” ही स्टार प्रवाह वरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेमधील मुक्ता हे पात्र प्रेक्षकांना खुप जवळच आहे. सुरवातीला मालिकेमध्ये मुक्ता हे पात्र अभिनेत्री तेजश्री प्रधान साकारत होती. परंतु काही कारणांमुळे अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने प्रेमाची गोष्ट हि मालिका सोडली. सध्या मालिकेत मुक्ता ही भुमिका अभिनेत्री स्वरदा ठिगळे साकारत आहे.

Premachi Goshta Fame Actress Car Accident
Premachi Goshta Fame Actress Car Accident

मलिका विश्वात कामाच्या तासांचा मुद्दा अनेक वेळा समोर आला आहे. बऱ्याच वेळा कलाकारांना १५ तास शूट करावे लागते आणि त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर तसेच खाजगी जीवनावर देखील पडताना दिसतो. असाच काहीसा प्रकार अभिनेत्री स्वरदा ठिगळे हिच्या सोबत झाला आहे. नुकताच अभिनेत्री स्वरदा ठिगळे हिचा अपधात झाला आहे आणि त्यात ती थोडक्यात बचावली आहे. या अपघाताविषयी माहिती तिने स्वतः Instagram स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर करत दिली आहे.

Swarada Thigale Accident
Swarada Thigale AccidentSwarada Thigale Accident

हेही वाचा :- गौतमी पाटीलच्या घायाळ अदांची प्रेक्षकांना भुरळ…

व्हिडीओ मध्ये स्वरदा म्हणते की आता सहा वाजले असून साधारण पाच साडेपाच वाजता माझ्यासोबत ही घटना घडली. त्यानंतर तिने तिच्या गाडीचा अपघात कसा झाला आणि गाडी कोणत्या परिस्थितीत आहे ते दाखवली. हे कसं झालं याबद्दल सांगताना ती म्हणाली की, मी स्टार प्रवाह वरचा प्रेमाची गोष्ट हा शो करते आहे.काल माझी सकाळी सात ते रात्री दहाची शिफ्ट होती. पण आमचा वटपौर्णिमेचा महासंगम एपिसोड शूट चालू असल्यामुळे काल सकाळी सात वाजता सुरू केलेल काम आज पहाटे पाच वाजता पॅकअप झालं. त्यानंतर ही गाडी मी एकटी मढला चांदीवलीहून चालवत आणली. मी प्रचंड थकले होते कारण सकाळी सात वाजल्यापासून सतत शूट चालू होतं. मला पेंग येत होती. मला अचानक डुलकी लागली आणि हे सगळं झालं.माझं खूप मोठं नुकसान झालं आहे. ( Premachi Goshta Fame Actress Car Accident )

Swarada Thigale Car Accident
Swarada Thigale Car Accident

हा महासंग खूप महागात पडला आहे. स्टार प्रवाहासाठी आम्ही जो महासंगम शूट करत होतो त्याचा मला जोरदार फटका बसला आहे. आता हे सगळं किती महागात पडेल याचा अंदाज मला नाही. पण मी नशिबाची या गोष्टीसाठी आभारी आहे की माझा मोठा अपघात झाला नाही किंवा गाडी आणखी कुठे जाऊन आदळली नाही. हे सगळ माझ्या जीवावर बेतल नाही याच मला बरं वाटतंय. त्यामुळे मी माझ्या सह कलाकारांना एक विनंती करते. तुम्ही यातून काहीतरी शिका. तुम्ही माझ्यासारखे नका करू. भविष्यात काय करू नये हे आता मला चांगलंच कळलं आहे. काम काय होतच राहील पण तुमचा जीव महत्त्वाचा आहे. ( Premachi Goshta Actress Accident )

दरम्यान झालेल्या प्रकारानंतर अवास्तव शुटींगच्या वेळा हा विषय पुन्हा एकदा प्रकर्षाने समोर आला आहे.

Leave a Reply