Prachi Pisat Controversy Latest update

अभिनेत्री प्राची पिसाट प्रकरणात अभिनेता सुदेश म्हशीलकर यांनी उचलले मोठे पाऊल (Prachi Pisat Controversy Latest update ) 

सध्या मनोरंजन विश्वात प्राची पिसाट हे प्रकरण चांगलंच गाजताना दिसत आहे. अभिनेते सुदेश म्हशीलकर यांनी प्राची सोबत फ्लॅट करण्याची इच्छा व्यक्त केली होती. प्राचीने सुदेश यांच्या मेसेजचे स्क्रीनशॉट काढून तिच्या सोशल मीडियावर शेअर केले होते. या प्रकरणात अनेक कलाकारांनी तसेच तिच्या चाहत्यांनी तिला पाठिंबा दर्शवला . तर अनेक कलाकारांनी सुदेश यांची देखील बाजू घेतली. ज्यांनी सुदेश यांची बाजू घेतली त्यांना देखील प्राचीने चांगलेच सुनावलेले पाहायला मिळाले.(Prachi Pisat Controversy Latest update ) 

कोण आहे अभिनेत्री प्राची पिसाट ?

प्राची पिसाट प्रकरण होऊन दोन दिवस उलटले तरी सुदेश यांच्याकडून कोणतीही माफी तसेच काही स्पष्टीकरण देखील आले नव्हते. परंतु आता या प्रकरणात एक मोठी बाब समोर येत आहे. अभिनेता सुदेश म्हशीलकर याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वरील सर्व पोस्ट डिलीट केल्या आहेत तसेच त्याने त्याचे फेसबुक अकाउंट देखील प्रायव्हेट केले आहे.

Who is Prachi Pisat ?
Who is Prachi Pisat ?

सुदेश म्हशीलकर अकाउंट हॅक झालं होतं का ? (Was Sudesh Mhashilkar’s account hacked ? )

सुदेश याचे फेसबुक अकाउंट हॅक झाले असल्यामुळे त्याच्याकडून मेसेज गेले असल्याचा दावा अनेक कलाकार तसेच त्यांच्या चाहत्यांनी केला होता. परंतु यावर प्राचीने म्हटलं होतं की मी माझ्या बाजूने सायबर क्राईमच्या अधिकाऱ्यांना विनंती करून आधीच चेक आणि कन्फर्म केलं होतं की त्यांच अकाउंट खरंच हॅक झालं आहे की नाही. यावेळी सायबर क्राईम टीमने मला सांगितलं की एप्रिलपासून त्यांचं अकाउंट हॅक झालं नव्हतं. (Prachi Pisat On Sudesh Mhashilkar )

Who Is Sudesh Mhashilkar ?
Who Is Sudesh Mhashilkar ?

हेही वाचा :- “देवमाणूसच्या शूटसाठी वाराणसी मध्ये ८-९ किलोमीटर सलग सायकल चालवली…” – किरण गायकवाड

दरम्यान या सगळ्या प्रकरणात सुदेश म्हशीलकर यांनी अभिनेत्रीची माफी मागितली नाही. तसेच त्यांची कोणतीही बाजू मांडलेली नाही उलट त्यांनी त्यांच्या या पोस्ट डिलीट केल्या आहेत आता यानंतर अभिनेत्री प्राची पिसाट यावर काय भूमिका घेतील तसेच सुदेश म्हशीलकर यांच्या देखील भूमिकेबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. ( Prachi Pisat Latest News )

Leave a Reply