Prachi Pisat On Sudesh MhashilkarPrachi Pisat On Sudesh Mhashilkar

“खुपच सेक्सी..नंबर पाठव” बड्या अभिनेत्याचे प्रायव्हेट चॅट लीक,मराठी अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल ( Prachi Pisat On Sudesh Mhashilkar )

अभिनेत्री प्राची पिसाट हि मालिका विश्वातील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. “तू चाल पुढं” या झी मराठीवरील मालिकेतून तिने खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळवली. प्राची सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती तिच्या कामाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून आपल्या कामाची माहिती तिच्या चाहत्यांना देत असते. परंतु नुकतेच तिने केलेल्या पोस्टमुळे मनोरंजन विश्वात चांगलीच खळबळ उडाली आहे.

अभिनेत्री प्राची पिसाट सोबत नेमकं काय घडलं ? ( Prachi Pisat Viral Post )
अभिनेता सुदेश म्हशीलकर हे मराठी मालिका विश्वातील मोठं नाव आहे. त्यांनी अनेक नावाजलेल्या मालिकेमध्ये काम केले आहे. सध्या ते स्टार प्रवाह वरील “कोण होतीस तू काय झालीस तू” या मालिकेत काम करत आहेत. परंतु नुकताच अभिनेत्री प्राची पिसाट हिने सुदेश म्हशीलकर यांच्या फेसबुक मेसेजचा स्क्रिनशॉट शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी तुझा नंबर पाठव ना , तुझ्याशी फ्लर्ट करायची इच्छा आहे , किती गोड दिसतेस.. असा मेसेज पाठवले असल्याचे दिसत आहे.

Prachi Pisat News
Prachi Pisat News

हेही वाचा :- ‘आंबट शौकीन’ चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित 

अभिनेता सुदेश म्हशीलकर यांनी केलेल्या मेसेजचा स्क्रिनशॉट शेअर करत प्राचीने “आणि मला हा स्क्रिनशॉट पोस्ट करायची इच्छा झाली. बायकोचा नंबर असेलच ,तीही गोड आहे. बघ जरा तिच्याशी फ्लर्ट करायला जमत का ? ही पोस्ट डिलीट कर सांगायला कुठून तरी नंबर मिळवशील आणि कॉल करशीलच असे लिहिले आहे
प्राची पिसाट हिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे ज्यावर अनेक नेटकरी प्रतिक्रिया देत असताना दिसत आहेत. (Actress Prachi Pisat Allegations On Sudesh Mhashilkar )

तसेच प्राचीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये सुदेश म्हशीलकर याचा आणखी एक मेसेज दिसत आहे. ज्यामध्ये त्यांनी खूप सेक्सी दिसायला लागली आहेस हल्ली असाही मेसेज केला आहे. ही पोस्ट शेअर करत तिने चला आता विषय संपूया पण त्यांनी फेसबुक वर माफी मागावी आणि जर माझी मागायची इच्छा नसेल वेळ नसेल तर बाकीच्या मुलींनी सांगितले तुमचे किस्से सांगू शकते असा इशाराही तिने या पोस्टमध्ये दिला आहे ( Prachi Pisat On Sudesh Mhashilkar )

Leave a Reply