अभिनेता मुकुल देव यांचे निधन,५४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास ( Mukul Dev Passes Away At 54 )
हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता मुकुल देव यांचे निधन झाले आहे. वयाच्या ५४ व्या वर्षी त्यांनी दिल्ली येथे अखेरचा श्वास घेतला. गेल्या बऱ्याच काळापासून ते गंभीर आजाराने त्रस्त होते. आणि अखेर त्यांची आज जीवनयात्रा संपली.

मिळालेल्या माहितीनुसार मुकुल देव यांच्या निघनाचे कारण अद्याप समोर आले नाही. परंतु काही दिवसापासून त्यांची तबियत ठीक नव्हती. त्यांनी आता पर्यंत अनेक चित्रपटात आपल्या अभिनय कौशल्याने छाप सोडली आहे. अभिनेता मुकुल देव यांना खरी ओळख मिळुन दिली ते म्हणजे “सन ऑफ सरदार” या चित्रपटाने. त्याचबरोबर चायना गेट , कयामत – सिटी अंडर थ्रेट या चित्रपटात देखील त्यांनी महत्वाच्या भुमिका साकारल्या.
हेही वाचा :- काळी जादू, अंधश्रद्धा आणि विवाहितेचा भूतकाळ ५ जूनला उलगडणार ?
अभिनेता मुकुल देव यांनी १९९० मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यांच्या अचानक जाण्याने मनोरंजन विश्वात मोठी शोककळा पसरली आहे. त्यांच्या चाहत्यांनी तसेच अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहिली.