कॉमेडी आणि आशयघन कथेची जोड असलेल्या ट्रेलरची हवा, ‘म्हणजे वाघाचे पंजे’ येतोय ३० मे पासून जवळच्या सिनेमागृहात ( Mhnaje Waghanche Panje Movie Trailer )
लग्न, लग्नासाठी घरच्यांची धडपड आणि मुलींचा आलेल्या स्थळाला नकार या सगळ्या गोष्टी अनेकदा कानावर पडतात. मात्र कुटुंबाची जबाबदारी ही या क्षणी तितकीच महत्त्वाची असते तर मुलांची मनही यावेळी महत्त्वाची असतात. या द्विधा मनस्थितीत अडकलेली एक नवी कोरी कहाणी लवकरच मोठ्या पडद्यावर येण्यास सज्ज होत आहे. हो, ‘म्हणजे वाघाचे पंजे’ हा नवाकोरा चित्रपट सिनेरसिकांच्या भेटीस येत आहे. चित्रपटाच्या समोर आलेल्या ट्रेलरने चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढवली आहे. हास्याची झालर घेऊन आशयघन कथेला हाताळत समोर आलेला चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांना कोड्यात पाडत आहे. ( Mhnaje Waghanche Panje Movie Trailer )
हेही वाचा :- अंगावर काटा आणणारा रितेश देशमुखच्या “राजा शिवाजी” चित्रपटाचा फर्स्ट लुक समोर
संजय नार्वेकर, दिपाली सय्यद या कलाकारांचा अभिनय ट्रेलरमध्ये बरच काही सांगून जात आहे. तर चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये समोर आलेली नवी अभिनेत्री तमन्ना बांदेकर तिच्या सुंदरतेने, अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकतेय. अर्थात चित्रपटात तमन्नावर लग्नाबाबत आलेल संकट ती कशी हाताळणार, आईच्या म्हणण्यानुसार ती लग्न करणार की स्वतःच्या मनाजोगा जोडीदार निवडणार हे अद्याप गुलदस्त्यात असलं तरी ट्रेलरमध्ये याची पाहायला मिळालेली झलक चित्रपटाची उत्सुकता ताणतेय. ( Mhnaje Waghanche Panje Marathi Movie 2025 )
हेही वाचा :- सोनाली कुलकर्णी हिच्या बिकनी लूकवर चाहते फिदा
‘TRISHOOLIN CINEVISION’ प्रस्तुत ‘म्हणजे वाघाचे पंजे’ या चित्रपटातून नवोदित अभिनेत्री तमन्ना बांदेकर प्रेक्षकांचं मन जिंकण्यास सज्ज झाली आहे. अभिनेत्री तमन्ना बांदेकर हिने या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली असून तिचं सिनेविश्वातील हे पदार्पण आहे. तमन्ना बांदेकर हीच या चित्रपटातून पदार्पण असून सौरभ गोखले, निखिल चव्हाण, संजय नार्वेकर, चिन्मय उदगीरकर, मेघराज भोसले, दिपाली सय्यद, प्राजक्ता हनमगर, अनिल नगरकर, घनश्याम दोरोडे, सिद्धेश्वर झाडबुके ही कलाकार मंडळी महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत.
‘TRISHOOLIN CINEVISION’, निर्मला रमेश बांदेकर निर्मित हा चित्रपट कौशिक मेहता, डॉ. सुनीता संतोष पोटे, डॉ. संतोष संपतराव पोटे प्रस्तुत म्हणजे वाघाचे पंजे’ हा चित्रपट असून या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा दिग्दर्शक स्वरूप सावंत याने सांभाळली असून दिग्दर्शनाबरोबर स्वरूप सावंत याने चित्रपटाच्या संकलनाची जबाबदारीही पेलवली आहे. तर संगीत हर्षवर्धन वावरे आणि त्रिनीती ब्रोस यांचे असून लेखक म्हणून संजय नवगिरे यांनी बाजू सांभाळली आहे. आणि हा संपूर्ण चित्रपट छायाचित्रकार वीरधवल पाटील यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. चित्रपटाच्या आशयघन कथेबरोबर चित्रपटाच्या तगड्या स्टारकास्टने लक्ष वेधून घेतलं आहे. ‘म्हणजे वाघाचे पंजे’ या नवाकोरा आणि रोमँटिक आशयघन चित्रपट लवकरच म्हणजे ३० मे रोजी रसिक प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.( Mhnaje Waghanche Panje Movie Trailer )