Ritesh Deshmukh Raja Shivaji New Motion PosterRitesh Deshmukh Raja Shivaji New Motion Poster

अंगावर काटा आणणारा रितेश देशमुखच्या “राजा शिवाजी” चित्रपटाचा फर्स्ट लुक समोर ( Ritesh Deshmukh Raja Shivaji New Motion Poster )
काही महिन्यापूर्वीच अभिनेता रितेश देशमुखने त्याच्या आगामी “राजा शिवाजी” या चित्रपटाची घोषणा केली होती.तेव्हापासून त्याच्य्या चाहत्यांमध्ये या चित्रपटाविषयी कमालीची उत्सुकता पहिला मिळत होती.
नुकतीच या चित्रपटाबाबत एक मोठी उपडेट समोर आली आहे. अभिनेता रितेश देशमुखने आज त्याच्या सोशल मीडियावरून “राजा शिवाजी’ या चित्रपटाचे पहिले मोशन पोस्टर शेअर केले आहे. आणि मुख्य म्हणजे या चित्रपटाची रिलीज डेट देखील जाहीर केली आहे. “महाराष्ट्राचं आराध्य दैवत, महापराक्रमी राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांना सिनेमारूपी अभिवादन, सादर करत आहोत “राजा शिवाजी” असे कॅप्शन देत रितेश देशमुखने चित्रपटाचे पोस्टर पोस्ट केले आहे. ( Ritesh Deshmukh As Chatrapati Shivaji Maharaj )

हेही वाचा :- सोनाली कुलकर्णी हिच्या बिकनी लुकवर चाहते झाले फिदा 

अभिनेता रितेश देशमुख “राजा शिवाजी” या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तो या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. तसेच त्याने या चित्रपटाचे दिग्दर्शन देखील केले आहे. तसेच जेनेलिया देशमुख आणि ज्योती देशपांडे या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अजय-अतुल यांनी याला संगीत दिले आहे.

( Riteish Deshmukh Chatrapati Shivaji Maharaj )

“राजा शिवाजी” या चित्रपटात अभिनेता रितेश देशमुख सोबतच संजय दत्त,महेश मांजरेकर,सचिन खेडेकर, फ़रदीन खान,अभिषेक बच्चन,जितेंद्र जोशी आणि भाग्यश्री अशी मोठी स्टारकास्ट असणार आहे.”राजा शिवाजी” हा चित्रपट १ मे २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट मराठी सोबतच हिंदी, तमिळ,कन्नड आणि मल्याळम अश्या सहा भाषेंमध्ये प्रदर्शित होणार आहे.( Ritesh Deshmukh New Movie 2026 )

Leave a Reply