“त्यामुळे दु: ख या गोष्टीचं आहे की..”
“नवरी मिळे हिटरला” फेम अभिनेत्रीने व्यक्त केल्या भावना ( Sharmlia Shinde On Navri Mile Hitlerla )
२०२४ मध्ये बऱ्याच नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत.परंतु सध्या मालिका विश्वात TRP ची स्पर्धा मोठी असल्यामुळे अनेक मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेतात. यामधीलच एक मालिका म्हणजे झी मराठीवरील नवरी मिळे हिटलरला,या मालिकेला नुकतेच एक वर्ष पुर्ण झाले होते परंतु नुकतीच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप आहे हे समोर आले आहे. नुकताच या मालिकेचा शेवटचा भाग शूट झाला. शेवटच्या दिवशी मालिकेतील अनेक कलाकारांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. अभिनेत्री शर्मिला शिंदे हिने मालिकेत दुर्गा ही भूमिका साकारली आहे. शर्मिला हिने नुकतीच “मराठी मनोरंजन विश्व” या युट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतील आपल्या भावना व्यक्त केल्या. ( Navri Mile Hitlerla Going Off Air )
नेमकं काय म्हणाली शर्मिला शिंदे ? ( Sharmlia Shinde On Navri Mile Hitlerla )
यावेळी शर्मिला शिंदे म्हणाली “शर्मिला म्हणाली, “कुठलीही मालिका सुरु झाल्यानंतर एक दिवस संपते. त्यात काही वादच नाही. पण, जितकी अपेक्षा केली होती की, या स्टोरीमध्ये खूप स्कोप होता. मला तरी असं वाटलं होतं की ३-४ वर्ष तरी ही मालिका सुरु राहिल. तेवढा तो टप्पा पूर्ण न करता जेव्हा एखादी मालिका थोडी लवकर संपते. तेव्हा दुः ख या गोष्टीचं होतं की आपण वर्षभर एका पात्रासाठी मेहनत घेतो. खरंतर ते पात्रांमध्ये रुळायला खूप वेळ लागतो. एक-दोन दिवसात ते होतं नाही. आपण हळूहळू ते पात्र स्थिर झालं होतं. त्यात आता कुठे सगळी पात्रं स्थिरावली होतं आणि प्रत्येकाला त्याचं उदिष्ट सापडलं होतं, आता मला काय करायचं? हे प्रत्येकाला समजलं होतं आणि त्यात मालिका बंद होते. त्यामुळे या गोष्टी पुन्हा नाही करता येणार. एक पात्र निवडल्यानंतर जेव्हा आपण तीन-चार वर्ष ती भूमिका साकारतो. तेव्हा असं वाटतं की आता मी त्या पात्राला न्याय दिला. ती मालिका जरी संपली त्या पात्राचं आयुष्य मी जगले असं वाटतं. तसं न होता मालिका लवकर संपतेय. हळूहळू सगळ्यांमधील केमिस्ट्री निर्माण झाली होती.” त्यानंतर अभिनेत्री म्हणाली, “त्यामुळे दु: ख या गोष्टीचं आहे की आता हे पात्र पुन्हा जगता येणार नाही. माझ्या यापूर्वीच्या मालिकां ४-५ वर्ष चालल्या आहेत. त्या पात्रांबद्दल मी आनंदी आहे. त्या भूमिका मी जगले. पण, आता इथे तसं होत नाही. कारण मला दूर्गा पुन्हा साकारता येणार नाही. खूप कष्टाने डायरेक्शन डिपार्टमेन्ट, रायटर्स, चॅनेल आणि कलाकार सगळे ते पात्र उभं करतो. अर्धवट राहिल्यासारख्या भावना निर्माण होतात. त्या गोष्टी मला करता येणार नाही. पण, हे कुठेतरी अर्धवट राहिल्याचं दुः ख मला होतंय.
प्रेक्षकांना मला एक सांगायचं आहे. या निर्णयामुळे तुम्ही नाराज झाला आहात हे मान्य आहे.( navri mile hitlerla last scene )
तुम्ही सुद्धा मालिकेशी भावनिकदृष्ट्या जोडले गेले आहात. पण, चॅनेल आहे ते काही चुकीचे निर्णय घेणार नाहीत. मालिकेची वेळ बदलली म्हणून टीआरपी कमी झाला, असं म्हणणं चुकीचं आहे.” असं म्हणत शर्मिला शिंदे हिने तिच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.