Hruta Durgule's mother-in-law attempted suicideHruta Durgule's mother-in-law attempted suicide

“माझ्या वडिलांनी दुसरं लग्न केलं त्यानंतर..” हृता दुर्गुळे हिच्या सासुने व्यक्त केली खंत 

Mugdha Shah : आपले रोजचे जीवन जगत असताना प्रत्येक माणसाला त्याच्या जीवनात संघर्ष करावा लागतो मग तो कलाकार असो किंवा सामान्य माणूस. नुकतेच एका प्रसिद्ध अभिनेत्रीने तिच्या जीवनाच्या संघर्षबद्दल सांगितले आहे. ही अभिनेत्री आहे मुग्धा शहा.( mugdha shah struggle story )

नेमकं काय म्हणाल्या अभिनेत्री मुग्धा शहा ?

नुकतीच तिने “मराठी मनोरंजन विश्व” या युट्युब चॅनलला मुलाखत दिली त्यात तिने तिच्या संघर्षमय जीवनाचा प्रवास उलगडा आहे. मुलाखतीत तिला आई बद्दल विचारले गेले यावर बोलताना मुग्धा शहा म्हणाल्या “आई हा शब्द माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे कारण मी माझ्या आईला पाहिलंच नाही. माझा जन्म झाला आणि २ महिन्यांनी माझ्या आईचं निधन झालं. त्याच्यामुळे मी माझ्या आईला पाहिलंच नाही. त्यामुळे आई हा शब्द त्या शब्दामागील भावना, महत्व आणि जबाबदारी हे सगळं मी पाहिलं. मला असं वाटतं की एक वेळ वडील नसले तरी मुलं मोठी होतात. त्यांना तेवढा त्रास होत नाही. पण, एकवेळ आई नसली तर एखाद्या बाळाचे किती हाल होतात याचा आपण विचार करु शकत नाही. मी तीन महिन्यांची झाल्यानंतर माझ्या वडिलांनी दुसरं लग्न केलं त्यानंतर सुख काय असतं ते मला माहितचं नव्हतं. पण, दुः ख मी डोंगराएवढं बघितलंय. अन्न काय असतं, भूक काय असते? हे बघितलचं नाही. त्रास, मार बघितला. उद्धवस्त बाळपण पाहिलंय.” ( Hruta Durgule’s mother-in-law attempted suicide )

हेही वाचा :- “त्यामुळे दु: ख या गोष्टीचं आहे की..”

यापुढे अभिनेत्रीने सांगितलं, “माझं लग्न विसाव्या वर्षी झालं. तोपर्यंत मी दोनदा आत्महत्येचा प्रयत्न केला. काहीवेळा आत्महत्या करण्यासाठी गेले आणि तिथून परत असंही घडलं आहे. या सगळ्यातून मी बाहेर आले. त्याच्यामुळे मला असं वाटतं ही एक दैवी शक्ती आहे. आता मी अध्यात्म या विषयाचा खूप अभ्यास करते. आता मला प्रारब्ध, कर्म याविषयी कळतं आहे. आता मला त्या गोष्टी त्रास देत नाहीत. पण, आठवणी तशाच राहतात. कारण आईचं प्रेम मला माहितचं नव्हतं. तेव्हा मी विचार केला की जे माझ्यासोबत घडलं ते माझ्यामुलांसोबत होऊ नये. त्यावेळी वडील असून सुद्धा नसल्यासारखे होते. त्याच्यामुळे एकटेपणा, भूक काय असते? लाचारी काय असते या सगळ्यात मी आयुष्याची वीस वर्षे काढली. “असा खुलासा करत त्यांनी मनातील त्यांच्या भावना व्यक्त केल्या. (mugdha shah latest interview )

अभिनेत्री मुग्धा शहा यांच्या अभिनय कारकिर्दीविषयी बोलायचे झाल्यास त्यांनी मराठी आणि हिंदी मालिका विश्वात मोठे योगदान दिले आहे.

Leave a Reply