Aai Tulja Bhawani Upcoming TwistAai Tulja Bhawani Upcoming Twist

आई तुळजाभवानी मालिकेतील राज्याभिषेक सोहळा ठरणार खास !

दीड ते दोन महिने सुरू होती तयारी…

मुंबई १७ मार्च, २०२५ – अलौकीक सौंदर्याचे प्रतीक, अगाध शक्तीचे स्वरूप, अपरिमित वात्सल्याची मूर्ती, धर्मरक्षिण्या आसनस्थ होणार सिंहासनी “आई तुळजाभवानी”. कलर्स मराठीवर संपन्न होणार आहे आई राजा म्हणजेच तुळजाभवानीचा नेत्रदीपक राज्याभिषेक सोहळा सप्ताह. तेव्हा आपण सगळे या सोहळ्याचे साक्षीदार होऊयात. पहा आई तुळजाभवानी राज्याभिषेक सोहळा सप्ताह, सोम १७ मार्च ते शनि २२ मार्च रात्री ९.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

आई तुळजाभवानी अर्थात माता पार्वतीचे गुरु भगवान महादेव यांच्या मागर्दशनानुसार भक्तांच्या मनात भयमुक्तीचे बीज रुजवण्यासाठी, दैवी कृपेची ज्योत पेटवण्यासाठी देवीच्या अढळस्थानासोबत तिचे कायमस्वरूपी अधिष्ठान निर्माण होण्यासाठी तिचा राज्याभिषेक आयोजित केला गेला आहे. देवी स्वत:चे महत्व वाढवून घेण्याच्या विरोधात असल्यातरी भक्तांच्या आयुष्यात निर्माण झालेल्या अनेक कसोटींच्या क्षणामुळे आणि महिषासुराच्या वाढत्या अत्याचारामुळे देवी राज्याभिषेकाचा प्रस्ताव स्वीकारते. समस्त देवगण, ऋषि, योगिनी ,गण, नंदी, देवीच्या आतापर्यंत पृथ्वीवरच्या निवासादरम्यान जवळचे नाते निर्माण झालेले प्रिय गावकरी यांच्या उपस्थितीत भव्यदिव्य सोहळा संपन्न होणार आहे.

देवीच्या राज्याभिषेकासाठी संपूर्ण टीमने विशेष मेहनत घेतली. त्या काळानुसार कुठले रंग असतील ? शालू कुठला असेल ? कुठल्या रंगाचं असेल. सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे देवीचा मुकुट… देवीच्या देवळात जसा मुकुट आहे तसाच असला पाहिजे. कारण देवी जेवढी तेजस्वी त्या मुकुटात दिसते तेवढी कुठल्याच मुकुटात दिसत नाही. दागिने तब्बल दीड ते दोन महिन्याआधी डिझाईन करून घेतले होते, कारणं देखील बरीच होती त्यामागे… मंगळसूत्राच्या वाटीसारखा दागिना हवा होता. पहिल्या रुपासाठी कलकत्त्यावरून खास दागिने बनविण्यात आले. यावेळेस लूक वेगळा असल्याने खास नवग्रहाचे पेंडन्ट असलेला चोकर खास बनवून घेण्यात आला. शेला तयार करताना आम्हाला खूप वेळ लागला. पण, दोन तीन महिन्यात संपूर्ण लूकची तयारी टीमने केली.

या सोहळ्यात आई राजा उदो उदोचा गजर पहिल्यांदा घडेल पण त्याच बरोबरीने देवीने राजदंड हाती घेतल्यानंतर न्यायनिवाड्यासाठी देवी समोर पहिले मागणे मागितले जाईल ते दैत्यगुरु शुक्राचार्य यांच्याकडून. ते काय असेल ? देवी काय न्याय देईल ? हा अत्यंत उत्सुकतेचा रंजक कथाभाग या राज्याभिषेक विशेष भागात उलगडणार आहे.

देवीच्या राज्याभिषेकादरम्यान उभा राहिलेला हा पेच आई तुळजाभवानीच्या अवतार कार्याला कोणते वेगळे वळण देणार ? शुक्राचार्यांचे गुरु भगवान महादेव काय भूमिका घेणार ? देवीच्या मंत्रीमंडळात कोण असेल ? प्रत्यक्ष गुरु महादेव समोर असताना देवी राजेपद कसे स्वीकारेल हा नाट्यमय भाग या राज्याभिषेक विशेष भागात दिसणार आहे, बरोबरीने न भूतों न भविष्यती असा अलौकिक सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा आहे.

हेही वाचा :- संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या भूमिकेत तेजस बर्वे

आई तुळजाभवानीच्या अवतार कार्याचा ‘आई राजा’ होण्याचा हा प्रवास, आईची भक्तांच्याप्रती भावनिक गुंतवणूक, आपुलकी, प्रेम यांचे जगावेगळे एकमेव उदाहरण आहे

Leave a Reply