अभिनेत्री पुर्वा कौशिक हिच्या खऱ्या आयुष्याबदल बरच काही ( Purva Kaushik Biography 2025 )
झी मराठी वरील शिवा ही मालिका कमी कालावधी मध्येच महाराष्ट्राची लाडकी मालिका झाली. या मालिकेत शिवा ही मुख्य भुमिका साकारणारी अभिनेत्री पुर्वा कौशिक हीला देखील महाराष्ट्राने भरभरून प्रेम दिले.
चला तर मग अभिनेत्री पुर्वा कौशिक हिच्या विषयी जाणून घेवूया काही महत्वाच्या गोष्टी..
पुर्वा कौशिक जन्म आणि वय ( Purva Kaushik BirthDate And Purva Kaushik Age )
अभिनेत्री पुर्वा कौशिक हिचा जन्म १४ जानेवारी १९९३ रोजी मुंबई इथे झाला आहे.2024 नुसार पुर्वा हिचे सध्याचे वय ३१ वर्ष आहे.अभिनेत्री पुर्वा कौशिक हिच्या वडिलांचे नाव राजेश राव तर आईचे नाव माधवी राजेश राव असे आहे तर पूर्वा हिच्या बहिणीचे नाव प्राजक्ता राव आणि भावाचे नाव मिहीर राजेश राव असे आहे.
पुर्वा कौशिक शालेय आणि उच्च शिक्षण ( Purva Kaushik Eduction ) –
अभिनेत्री पुर्वा कौशिक हिचे शालेय शिक्षण भगिनी मंडळ हायस्कुल अंबरनाथ मधून झाले आहे. तसेच तिचे उच्च शिक्षण CHM कॉलेज उलासनगर मधून झाले आहे.पुर्वा हिने बी.ए पर्यंतचे शिक्षण पुर्ण केले आहे.
पुर्वा कौशिक छंद ( Purva Kaushik Interest ) –
अभिनेत्री पुर्वा कौशिक हिला लहानपणापासून डान्स आणि अभिनयाची आवड होती. पुर्वाचा बालनाट्यामध्ये देखील विशेष सहभाग असायचा.
तिने शालेय आणि कॉलेज जीवनात अनेक स्पर्धा मध्ये भाग घेवुन चांगले असे यश मिळवले आहे.पूर्वा हिला स्पोर्ट मध्ये खो खो आवडतो होता. पुर्वा हिला अभिनयाबरोबरच फिरण्याची देखील खूप आवड आहे. तसेच तिला मुक्या प्राण्याविषयी देखील विशेष प्रेम आहे. पुर्वा हिला डान्स आवड आल्यामुळे तिने फुलवा खामकर हिच्या सोबत देखील डान्सचे अनेक शो केले आहेत.
पुर्वा कौशिक नाटक ( Purva Kaushik Natak ) –
पुर्वा हिला लहान पणापासूनच नाटक हे खूप जवळचे होते. तिने अनेक नाटकामध्ये काम केले आहे. पुर्वा हिने जाऊ द्या ना भाई, कानाची घडी तोंडावर बोट , डोन्ट वरी हो जायेगा, हम पाच या नाटकांमध्ये काम केले आहे.
पुर्वा कौशिक मालिका ( Purva Kaushik Serial ) –
पुर्वा कौशिक टी.वाय.बीए मध्ये शिकत असताना तिला पहिल्यांदा लज्जा या मराठी मालिकेसाठी विचारणा झाली होती. तेव्हा तिने या मालिकेसाठी ऑडीशन देखील दिले होते परंतु मग तिने त्यांना सांगून टाकले की मला पहिल्यादा माझे शिक्षण पुर्ण करायचे आहे. असे म्हणून पुर्वा हिने ती मालिका केली नाही. २०१४ मध्ये पुर्वा हिने अस्मिता या मालिकेत काम केले होते. त्यानंतर पुर्वा हिने २०१५ मध्ये लक्ष्य मालिकेत काम केले. तसेच २०१७ मध्ये तिने झी युवा वरील फ्रेशर्स मालिकेत देखील काम केले होते . या मालिकेत तिने गुजराती मुलीची भुमिका साकारली होती.
पुर्वा हिला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली ती कॉमेडीची बुलेट ट्रेन या शो मधून. या शोमुळे तिला चांगली ओळख मिळाली होती. त्यानंतर तिने २०१९ साली स्टार प्रवाह वरील साथ दे तू मला या मालिकेत मीरा ही भुमिका साकारली होती. त्यांनतर २०२० साली पुन्हा एकदा स्टार प्रवाह वरील फुलाला सुगंध मातीचा या मालिकेत आरती कदम हि भूमिका साकारली होती. २०२१ मध्ये सोनी मराठी वरील अजूनही बरसात आहे या मालिकेत मानस्वीनी देसाई हि भुमिका साकारली होती. त्यानंतर २०२२ मध्ये कलर्स मराठी वरील भाग्य दिले तू मला या मालिकेत वैदही हि भुमिका साकारली .
या मालिकेत तिची भूमिका जरी छोटी असली तरी या मालिकेने तिला चांगली ओळख मिळवून दिली. मग २०२४ मध्ये पुर्वा हिला पहिली मुख्य भूमिका असलेली मालिका भेटली आणि ती मालिका म्हणजे झी मराठी वरील शिवा . शिव ह्या मालिकेतून पूर्वा कौशिक हिला चांगलीच लोकप्रियता भेटली. मुख्य म्हणजे या मालिकेसाठी तिने तिचे केस देखील कापले.
पुर्वा कौशिक चित्रपट ( Purva Kaushik Movies )
अभिनेत्री पुर्वा कौशिक हिने आता पर्यंत कोणत्याही चित्रपटात काम केले नाहीये.
पुर्वा कौशिक वैवाहिक जीवन ( Purva Kaushik Married Life )
पुर्वा कौशिक हिच्या वैवाहिक जीवनाविषयी बोलायचे झाल्यास तिने अमोघ फडके याच्या सोबत २०१८ साठी लग्न केले.
अमोघ हा लायटिंग डायरेक्टर असून त्याने आता पर्यंत अनेक नाटकांना लायटिंग डायरेक्टर म्हणून काम केले आहे. अमोघ याला देखील फिरण्याची खूप आवड आहे त्यामुळे कामातुन वेळ भेटल्यावर पूर्वा आणि अमोघ फिरायला जात असतात.
पुर्वा कौशिक इंस्टाग्राम ( Purva Kaushik Instagram)
अभिनेत्री पुर्वा कौशिक ही सोशल मीडिया वर देखील सक्रिय असते. तिचे इंस्टाग्राम वर 94.5K Followers आहेत. पुर्वा नियमित पणे तिच्या अकाउंट वरून चाहत्यांसोबत संपर्कात असते
पुर्वा कौशिक मानधन ( Purva Kaushik Net Income ) Purva Kaushik Biography 2025
अभिनेत्री पुर्वा कौशिक ही सध्या झी मराठी वरील शिवा या मालिकेत मुख्य भुमिका साकारत असून तिला या मालिकेसाठी प्रत्येक भागाला तीस हजार येवढे मानधन मिळते.
अभिनेत्री पुर्वा कौशिक ही सध्या या मालिकेमुळे घरात घरात पोहचली.