इतके कोटी रुपये प्राजक्ता माळी आम्हाला परत देईल तेही १८ टक्के व्याजासकट, प्राजक्ता माळीने केला मोठा खुलासा !! ( Prajkata Mali On Phullwanti )
फुलवंती या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajkata Mali) हिने पहिल्यांदाच निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले. फुलवंती या चित्रपटाला महाराष्ट्राच्या प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. फुलवंती हा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ५० दिवस देखील पूर्ण केले. या चित्रपटातील सर्व गाणी चांगलीच गाजली.या सर्व गाण्यामधील अशी मी मदन मंजिरी हे गाणं चांगलंच गाजलं होतं. या गाण्यातील प्राजक्ता माळी हिच्या अभिनयाचे आणि नृत्याचे कौतुक करण्यात आले.
फुलवंती (Phullwanti Marathi Movie ) सारखा ड्रीम प्रोजेक्ट प्रत्यक्षात येणं सोपं नव्हतं असं अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने नुकत्याच राजश्री मराठी ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.
या वेळी प्राजक्ता माळी म्हणाली ” मी फुलवंतीसाठी निर्माती म्हणून काम केलं. त्यामुळे मी या चित्रपटासाठी मानधन घेतलं नव्हतं. मी पैसे लावला नव्हता ,त्यामुळे त्या दृष्टीने मी सेफ होते. मंगेश पवार,अमित जोशी आणि अर्थात प्यानोरमा स्टुडिओजचे पैसे यासाठी लागले होते. पण,मला सर्वात महत्वाचं नावं होतं. जवळपास एक वर्ष हा प्रोजेक्ट पैशाअभावी थांबला होता,त्यामुळेच मी एवढी मरमर केली. किमान ५० लोकांच्या दारात जाऊन मी या प्रोजेक्टसाठी पैसे द्या अशी मागणी केली होती. हे खरच खुप अवघड आहे. यासाठी मी पॅनोरमाचे आभार मानते की, त्यांनी तेव्हा विश्वास ठेवून मला पैसे दिले.
अभिनेत्री प्राजक्ता माळी पुढे म्हणाली ,” आता प्रोजेक्ट संपलाय,यामुळे सांगायला हरकत नाही. मी तेव्हा एक कॉन्ट्रॅक्ट साइन केलं होतं. त्यावर असं लिहलं होतं की प्राजक्ता माळी यांना इतके करोड देतोय ,हा चित्रपट जर बंद पडला किंवा ऑक्टोबर २०२४ च्या आधी जर हा चित्रपट पुर्ण झाला नाही तर ,इतके कोटी प्राजक्ता माळी आम्हाला परत देईल तेही १८ टक्के व्याजासकट. हा असा मोठा करार मी तेव्हा केला होता. मदन मंजिरीवर नाचताना सुद्धा हे करोडो रुपयाचं ओझं डोक्यावर होतं. त्यामुळे हे अजिबातच सोपं नाहीये.”
“माझी आई तेव्हा माझ्या पाठीशी खुप खंबीरपणे उभी राहिली. आई म्हणाली होती काळजी करू नकोस,तू जे करशील मी आहे तुझ्या बरोबर.. आम्हला माहिती आहे याला यश नाही आलं तरी तू सगळं परत कमावशील. दुसऱ्या शेड्युलला दहाच्या दहा दिवस माझं कुटुंब सेटवर उपस्थित होत .पॅनोरमाची टीम सुद्धा होती. ती सही करतानाचा फोटो मी मध्यतंरी शेअर सुद्धा केला होता. त्या फोटोत आम्ही हसत होतो पण या सगळ्यातून मी खुप काही शिकले. पहिल्या प्रोजेक्क्ट मधून असंख्य गोष्टी समजल्या असं प्राजक्ता माळी हिने सांगितले.
हेही वाचा :- तु माझ्या बरोबर लग्न करणार..प्राजक्ता माळीने स्पष्ट सांगून टाकले की.. ( Prajakta Mali On Getting Married )
दरम्यान फुलवंती या चित्रपटाचे दिग्दर्शन स्नेहल तरडे यांनी केले होते तर प्राजक्ता माळी सोबत अभिनेता गश्मीर महाजनी याची देखील या सिनेमात महत्वाची भुमिका होती. फुलवंती हा चित्रपट आता तुम्ही घर बसल्या देखील पाहू शकता. हा चित्रपट अमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्म वर दाखल झाला आहे. ( Phullwanti On OTT Platform )