Priyanka Chopra Bollywood ComebackPriyanka Chopra Bollywood Comeback

 प्रियांका चोप्रा करणार बॉलीवूड मध्ये कमबॅक !!! ( Priyanka Chopra Bollywood Comeback )

अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने आपल्या कामाने बॉलिवूड तसेच हॉलिवूड मध्ये देखील आपले वेगळे असे स्थान निर्माण केले आहे. प्रियांका अभिनयासोबत तिच्या फिटनेस आणि सौंदर्यसाठी देखील ओळखली जाते. प्रियांका सध्या हॉलिवूड मध्ये काम करताना आपल्याला दिसत आहे पण तिचे चाहते ती बॉलिवूड मध्ये कधी काम करणार याची वाट बघत आहेत. पण आता तिच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे प्रियांका लवकरच बॉलीवूड मध्ये कमबॅक करणार आहे.

नुकतेच अभिनेत्री प्रियांका चोप्रा अरेबिया येथील जेदाह येथे आयोजित रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये सहभागी झाली होती. त्या ठिकाणी प्रियांका आगामी भारतीय चित्रपटाविषयी बोलताना म्हणाली ,” मी कठेही जाते ,तिथे कामाच्या माध्यमातून मी माझी ओळख प्रस्थापित करते. ही सवय माझ्या संगोपनाचा एक भाग आहे. भारतीय चित्रपट नेहमीच माझ्या हृदयाचा भाग आहेत. ते माझ्यापासून कोणीही काढू शकत नाही. मी २०२५ मध्ये एक हिंदी चित्रपट साइन करणार आहे. आपण सर्वानी शुभेच्छा पाठवा ,जेणेंकरून हे खरे होईल.”

दरम्यान प्रियांका चोप्रा ही फरहान अख्तरच्या जी ले जरा या चित्रपटातून कमबॅक करणार होती. या चित्रपटात प्रियांका सोबत आलिया भट्ट आणि कतरीना कैफ मुख्य भूमिकेत होत्या. पण नंतर या फिल्मचे काही अपडेट आले नाहीत.
नुकतीच अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिची सिटाडेल ही स्पा थ्रिरल सिरीज अमेझॉन प्राईम वर प्रदर्शित झाली. परंतु आता ती तिच्या पुढील बॉलिवूड चित्रपटाची घोषणा कधी करणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply