आणि आमची “ही” मला जरा जास्तच.. अभिनेता कुशल बद्रिकेची पोस्ट चर्चेत (Kushal Badrike latest Post with Wife )
झी मराठी वाहिनीवरील चला हवा येऊ द्या शो मधून महाराष्ट्राच्या घराघरात पोहचलेला विनोदी अभिनेता कुशल बद्रिके नेहमीच चर्चेत असतो. कुशल सोशल मीडियावर देखील चांगलाच सक्रिय असल्याचे आपल्याला पाहिला मिळते. कुशल त्याच्या बायकोसोबत नेहमीच मजेशीर व्हिडीओ आणि फोटो टाकत असतो .
कुशल बद्रिके याने नुकतीच त्याच्या बायकोसोबत एक पोस्ट केली आहे मात्र याला दिलेल्या कॅप्शनची सध्या जोरदार चर्चा आहे. कुशल याने त्याची पत्नी सुनयना हिच्या सोबत फोटो पोस्ट करत लिहिले आहे की,”संसारात एक बोलणारं आणि एक ऐकणारं हवं ,आमच्या संसारात मी बोलणारा आणि आमची “ही” मला जरा जास्तच बोलणारी आहे.. आमचा संसार चालत नाही तो आम्हाला घाबरून पुढे पुढे धावतोय…. कुशल याच्या या पोस्टवर त्याच्या चाहत्यांनी देखील मजेशीर कमेंट केल्या आहेत.
एका युजरने लिहले आहे की असाच सुखाने धावत संसार चालूदे तुमचा.. तर दुसऱ्या युजरने म्हंटले आहे की कुर्त्याच्या पाठीमागे “सुनयना कथ्थक क्लासेस” टाकले असतेस तर ऑस्कर तुलाच होता ह्या एक्टिंगबद्दल 😂
हेही वाचा :- तु माझ्या बरोबर लग्न करणार..प्राजक्ता माळीने स्पष्ट सांगून टाकले की.. ( Prajakta Mali On Getting Married )
अभिनेता कुशल बद्रिके याच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास कुशल याने अनेक मराठी मालिका आणि चित्रपट यामधून काम केलं आहे पण त्याला खऱ्या अर्थाने ओळख चला हवा येऊ द्या या शो मिळाली असे म्हणता येईल . नुकताच कुशल बद्रिके याने ‘मॅडनेस मचाऐंगे इंडिया को हसायेंगे’ या हिंदी कॉमेडी शो मध्ये देखील भाग घेतला होता.