जय मल्हार फेम अभिनेत्री सुरभी हांडे हिचे छोट्या पडद्यावर कमबॅक !!! ( Surabhi Hnade New Serial )
अभिनेत्री सुरभी हांडे ही जय मल्हार या झी मराठीवरील मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहचली. या मालिकेत तिने म्हाळसा ही भुमिका साकारली होती. अभिनेत्री सुरभी हांडे हिची आता कलर्स मराठी वाहिनीवरील आई तुळजाभवानी या मालिकेत एन्ट्री होणार आहे.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी या मालिकेत आपल्याला देवीचे विविध अवतार पहिला मिळाले आहेत. या मालिकेत सुरभी हांडे म्हाळसाच्या भुमिकेत दिसणार आहे. आत पुढील काही भागात तुळजा आणि म्हळसा मिळुन दुर्जनांचा नाश कसा करणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
म्हाळसा या भूमिकेत या पूर्वी देखील अभिनेत्री सुरभी हांडे हिने प्रेक्षकांची मने जिंकली आहे. आता आई तुळजाभवानी मालिकेतून ती प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे. नुकताच सुरभी हांडे हिचा या मालिकेतील म्हाळसा या पात्राचा लुक समोर आला आहे त्यामध्ये नाकात सुंदर अशी नथ अंगावर भरपूर असे दागिने असा लूक पाहिला मिळत आहे.
हेही वाचा :- लग्नाच्या पुजेत उखाणा घेताना अभिनेता निखिल राजेशिर्के याची वळाली बोबडी !!!
दरम्यान आई तुळजाभवानी ही मालिका पप्रेक्षकांना दररोज रात्री ९. ०० वाजता कलर्स मराठी वाहिनीवर पाहिला मिळणार आहे.