लग्नाच्या पुजेत उखाणा घेताना अभिनेता निखिल राजेशिर्के याची वळाली बोबडी !!!
काही दिवसापूर्वी अभिनेता निखिल राजेशिर्के हा लग्न बंधनात अडकला. त्याने १७ नोव्हेंबर रोजी मित्रपरिवार आणि कुटुंबाच्या साक्षीने लग्न केले. या लग्नाचे फोटो देखील सोशल मेडीआयवर चांगलेच व्हायरल झाले होते. नुकताच निखिल याने त्याच्या इंस्टाग्राम वरून सत्यनारायण पुजेचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
या व्हिडिओ मध्ये निखिलने त्याच्या बायकोसाठी एक खास उखाणा घेतला आहे पण हा उखाणा घेत असताना त्याची बोबडी वळल्याचे आपल्याला व्हिडिओ मध्ये दिसत आहे. या व्हिडीओ ला त्याने सुदर असे कॅप्शन देखील दिले आहे त्यात याने लिहले आहे की ,’पाहू दे असेच तुला नित्य हासता जाउ दे असाच काळ शब्द झेलता मीलनात प्रेमगीत धन्य होऊ दे जीवनात ही घडी अशीच राहू दे ❤️”
हेही वाचा :- अभिनेत्री स्मिता गोंदकर हिचे बिकिनी मधले बोल्ड फोटो होत आहेत व्हायरल !!!
अभिनेता निखिल राजेशिर्के याच्याबद्दल बोलायचे झाल्यास त्याने अनेक मालिका आणि चित्रपटातून काम केले आहे. तसेच तो बिग बॉस मराठी मध्ये देखील सहभागी झाला होता.