बाकी सगळं जग एका बाजूला आणि.. लग्नाच्या वाढदिवशी पत्नीसाठी शशांक केतकर याची खास पोस्ट ( Shashank Ketkar Post For His Wife )
अभिनेता शशांक केतकर याने चित्रपट मालिका नाटक आणि वेबसरीज अश्या सर्व माध्यमातून आपला अभिनयाचा ठसा उमटवला आहे. शशांक केतकर हा सध्या स्टार प्रवाह वरील मुरांबा या मालिकेतुन प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.
अभिनेते शशांक केतकर याने ४ डिसेंबर २०१७ रोजी त्याची मैत्रीण असलेल्या प्रियांका ढवळे सोबत लग्नगाठ बांधली. आजच्या दिवशी त्यांच्या लग्नाला ७ वर्ष झाली आहे. या निमित्ताने शशांक केतकर याने एक खास पोस्ट करत बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा :- अभिनेत्री स्मिता गोंदकर हिचे बिकिनी मधले बोल्ड फोटो होत आहेत व्हायरल !!!
शशांक केतकर त्याने प्रियांका सोबतचे फोटो असलेला एक व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्राम वरून शेअर केला आहे. कॅप्शन मध्ये त्याने लिहले आहे की ;फक्त ७ वर्ष झाली ,बाकी सगळं जग एका बाजूला आणि तुझ्यावरच प्रेम एका बाजुला आणि तुझ्यावरच प्रेम… तू एका बाजूला’
अभिनेता शशांक केतकर याच्या या पोस्ट वर त्याच्या चाहत्यांनी आणि मनोरंजन विश्वातील मित्रांनी त्या दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. शशांक आणि प्रियांका या दोघांना ऋग्वेद नावाचा मुलगा आहे.