सावलीची लग्नानंतरची असणार परीक्षा !! (Savalyachi Janu Savali Upcoming Twist)
सावळ्याची जणू सावली ही झी मराठी वरील लोकप्रिय मालिका आहे. सध्या मालिकेत काही दिवसापूर्वी सावली हिचे लग्न झाले आहे. या लग्नानंतर आता सावली हिचे आता पूर्ण आयुष्य बदललं आहे. तिला आता भैरवी सोबत तिलोत्तमाचा देखील सामना करावा लागणार आहे. एका बाजूला भैरवी आणि तारा काळजी मध्ये आहे कारण त्यांना गाण्याच्या काही संधी गमवाव्या लागल्या आहेत. आणि दुसरीकडे त्यांचा व्हिडिओ जगन्नाथ कडे आहे आणि तो कसा मिळवायचा याची देखील त्यांना चिंता लागली आहे.
हेही वाचा :- अभिनेत्री प्राप्ती रेडकर हिच्या खऱ्या आयुष्याबदल बरच काही
अश्या या सर्व परिस्थिती मध्ये भैरवी सावली हिला भेटते आणि भेटल्यावर ती तिला तिच्या वचनाची आठवण करून देते. दरम्यान सारंग हा लग्नानंतर पहिल्यांदाच बाहेर जाणार असतो, पण तिलोत्तमाच्या सांगण्यावरून तो थांबतो. ऐश्वर्या देखील त्याला अस्मिची आठवण करून देते. त्यामुळे त्याच्या मनात सावलीच्या प्रामाणिकपणाबद्दल शंका निर्माण होते. सावली हि देखील सासरी परत आल्यामुळे तिलोत्तमा हिला राग येतो आणि ती घर सोडून निघून जाते. ऐश्वर्या ही सावली ला स्वयपाक घरात ठेवते. तसेच घरात असं ठरवलं जातं की सावली हिच्या कुटुंबातील कोणीही लग्नाच्या रिसेप्शनला येणार नाही. यामुळे सावली मात्र निराश होत.
ऐश्वर्या कडून भैरवी हिला रिसेप्शनसाठी गाण्याच्या कार्यक्रमाबद्दल कळवते. सावलीवर दबाव असूनही भैरवी ठामपणे सांगते की सावलीला कार्यक्रमात गाणे गावे लागेल. या रिसेप्शनसाठी अमृता सावली हिला पारंपारिक महाराष्ट्रीयन पोशाखात नटवणार आहे. सावली हिचा हा महाराष्ट्रीयन लुक सर्व मीडियाचे लक्ष् वेधून घेतो. रिसेप्शनच्या तयारीच्या वेळी ऐश्वर्या सावलीवर कानातले चोरल्याचे आरोप करते तिची घरातील सर्वांनसमोर चौकशी देखील केली जाते.
हेही वाचा :- अभिनेत्री स्मिता गोंदकर हिचे बिकिनी मधले बोल्ड फोटो होत आहेत व्हायरल !!!
तेव्हा मात्र सावली उत्तरे देते की ,जर मी चोर नाही हे सिद्ध होणार नसेल तर मी इथे राहणंर नाही.सावली ऐश्वर्याच्या जाळ्यात अडकेल? रिसेप्शन मध्ये पारंपारिक लुक पाहून सर्व काय म्हणतील? यासाठी बघायला विसरू नका “सावळ्याची जणू सावली” दररोज संध्या ७:३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.