Jalebi Marathi MovieJalebi Marathi Movie

स्वप्नीलचा बेधडक डॅशिंग अंदाज असलेला जिलबी चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला !! ( Jalebi Marathi Movie )

अभिनेता स्वप्नील जोशी याची ओळख मराठी चित्रपट सृष्टीतील एक ग्लॅमरस आणि डॅशिंग हिरो म्हणून ओळख आहे. वेगवेगळ्या भूमिकांच्या माध्यमातून स्वनिल जोशी याने सर्वांचे मनोरंजन केले आहे. स्वप्नील आता त्याच्या आगामी ‘जिलबी’ या चित्रपटात डॅशिंग पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले. ‘जिलबी’ हा चित्रपट १६ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटली येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नितीन कांबळे यांनी केले आहे.

आपल्या भूमिकेबद्दल बोलताना स्वप्नील सांगते की, ‘आपला पोलिसी खाक्या दाखवत चोख कामगिरी बजावणारा  हा  पोलीस अधिकारी आहे. माझ्या आजवरच्या भूमिकांपेक्षा वेगळी भूमिका मला करायला मिळाल्याचा आनंद आहे. विशेष म्हणजे  पोलिसांचा अंदाज,  त्यांच्या जबरदस्त  व्यक्तिमत्वाचा  लहेजा हे सगळं करण्यात एक वेगळीच मजा आली. प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारा ‘जिलबी’ हा चित्रपट आहे. भूमिका कोणत्याही प्रकारची असली, तरी ती चांगली व्हावी यासाठी कलाकारांना कष्ट घ्यावे लागतात. एकाच प्रकारच्या भूमिकांमध्ये अडकून पडायचं नसल्याने ही वेगळी भूमिका स्वीकारल्याचं स्वप्नील सांगतो.

हेही वाचा :- अभिनेत्री विदुला चौगुले हिचे बिकिनी मधले फोटो पाहून चाहत्यांची थंडी झाली गायब ( Vidula Chougule Bikini Photos )

स्वादिष्ट जिलबी वेगवेगळ्या प्रक्रियांमधून जात असते.‘जिलबी’ हा चित्रपटसुद्धा वेगवेगळ्या चवींचा आस्वाद आपल्याला  देणार आहे, ज्यात  विविध व्यक्तिरेखा, त्यांचे स्वभाव वैशिष्ट्ये आणि सोबत  रहस्याचा थरार असं  बरंच काही आहे.  ‘जिलबी’ चित्रपटाची कथा-पटकथा-संवाद मच्छिंद्र बुगडे यांचे आहेत. आनंद पंडित आणि रूपा पंडित हे चित्रपटाचे निर्माते आहेत. क्रिएटिव्ह दिग्दर्शन आणि सहनिर्मितीची जबाबदारी राहुल व्ही. दुबे यांनी सांभाळली आहे. छायांकन गणेश उतेकर तर कलादिग्दर्शन कौशल सिंग यांचे आहे. कार्यकारी निर्माते महेश चाबुकस्वार आहेत.

Leave a Reply