अभिनेत्री प्राजक्ता माळीला नवोदित कवी म्हणून ‘मसाप’चा पुरस्कार जाहीर !! ( Prajkta Mali Awarded as Poet)
मराठी मनोरंजन विश्वातील एक बहुगुणी अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळी हिच्याकडे पहिले जाते. प्राजक्ता माळी हिने अभिनय नृत्य आणि निवेदन अश्या वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. नुकतेच प्राजक्ता माळी हिने फुलवंती या चित्रपटाच्या माध्यमातून निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. फुलवंती या चित्रपटाला महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळाला. नुकतेच या चित्रपटाने सिनेमा गृहात आपले ५० दिवस पुर्ण केले.
अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचा ‘प्राजक्तप्रभा’ हा कवितासंग्रह प्रकाशित झाला होता. तिच्या या कविता संग्रहाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. नुकताच प्राजक्ता माळी हिच्या या पहिल्या कवितासंग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषदेकडून पुरस्कार जाहीर झाला आहे.
माजी आमदार अनंत गाडगीळ यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेला दिलेल्या देणगीतून दोन वर्षांपासून एका जेष्ठ आणि एका नवोदित कवयित्रीला सुनीताबाई गाडगीळ स्मृती साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदाच्या वर्षी या पुरस्कारासाठी जेष्ठ कवयित्री पद्मरेखा धनकर ( चंद्रपूर) आणि नवोदित कवयित्री प्राजक्ता माळी (पुणे) यांची निवड करण्यात आली. सदर पुरस्काराचे स्वरूप अनुक्रमे अकरा आणि दहा हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे आहे.
१३ डिसेंबर सायंकाळी सहा वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात जेष्ठ कवी प्रवीण दवणे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला माजी आमदार अनंत गाडगीळ ,परिषदेच्या प्रमुख कार्यवाहक सुनिताराजे पवार उपस्थित राहणार आहे.
हेही वाचा :- प्राजक्ता माळीचा ‘फुलवंती’ चित्रपट OTT वर दाखल !!
दरम्यान अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीला पुरस्काराचे पत्र शेअर करत म्हंटले आहे की ‘द्यन्यवाद… मी कवियित्री आहे ह्याची आठवण करून दिल्याबद्दल आणि अर्थातच पुरस्कारासाठी सुद्धा’ (Prajkta Mali Awarded as Poet )