Tejaswini Pandit Post On Maharashtra Election Result 2024Tejaswini Pandit Post On Maharashtra Election Result 2024

..आणि काहीजण का नाही हे अनुउत्तरित राहिल,मनसेच्या पराभवानंतर तेजस्वीनी पंडितची पोस्ट चर्चेत ( Tejaswini Pandit Post On Maharashtra Election Result 2024 )

विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी झाला. या निकालामध्ये महायुतीला बहुमत मिळालं हे स्पष्ट झालं. या निकालामध्ये महायुतीला २३५ इतक्या विक्रमी जागा भेटल्या. त्यामुळे भाजप पुन्हा एकदा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. यंदाच्या निवडणुकीत सर्वांचे लक्ष असलेल्या मनसेला मात्र एकही खातं उघडता आले नाही. मनसेच्या या पराभवानंतर राजकीय आणि मनोरंजन विश्वात अनेक चर्चा रंगलेल्या आपल्याला पाहिला मिळालं.

मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री तेजस्वीनी पंडित हिने देखील मनसेचा पराभव झाल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. तिने केलेली पोस्ट सध्या तुफान व्हायरल होत असताना दिसत आहे.

हेही वाचा :- बॉलिवूड आणि साऊथ सिनेमाला टक्कर देणारा ‘मराठी अँक्शनपट ( Raanti Movie Review 2024 )

अभिनेत्री तेजस्विनी पंडित एक्सवर (ट्विटर) पोस्ट करत म्हणाली ,’विजयी उमेदवाराचं अभिनंदन !! कोण ? कसं ?आणि काहीजण का नाही हे अनुउत्तरित राहिलं ,त्यांच्या micro management ला १००/१०० , पण तरीही …… राजसाहेब ठाकरे…. आमचा राजा हरला नाही,महाराष्ट्र हरलास तू…’असं लिहिलं आहे. तिच्या या पोस्ट वर राजसाहेब ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी देखील कंमेंट करत तिच्या पोस्ट चे समर्थन केले आहे.

हेही वाचा :- ‘मन धागा धागा जोडते नवा’ फेम अभिनेत्रीची झी मराठीवर वर्णी ( Laxmi Niwas Marathi Serial 2024 )

दरम्यान २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात मनसेचे १२५ उमेदवार उभे होते. पण मनसेला मात्र एकही विजय मिळाला नाही. निकालानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांनी एक्सवर अविश्व्सनीय !! तूर्तास एवढेच… अशी पोस्ट केली आहे.

 

Leave a Reply