ह्या शुक्रवारी असणार मनोरंजनाचा महाधमाका ( Friday Marathi Movie Release )
हा शुक्रवार चित्रपट रसिकांसाठी एक पर्वणी ठरणार आहे. याचे कारण असे की या शुक्रवारी (22 November 2024) तब्बल तीन मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या मध्ये रानटी ,गुलाबी आणि धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. (Marathi Movie 2024)
सध्या सर्वत्र ज्या चित्रपटाची चर्चा आहे असा रानटी हा चित्रपट या शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. ह्या चित्रपटात अभिनेता शरद केळकर याची मुख्य भुमिका आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन समित कक्कड यांनी केले आहे. तसेच या चित्रपटाची निर्मिती पुनीत बालन यांनी केली आहे. या चित्रपटात अभिनेता संतोष जुवेकर,संजय नार्वेकर,शान्वी श्रीवास्तव,नागेश भोसले आणि अशी अनेक तगडी स्टार कास्ट या चित्रपटात आपल्याला पाहिला मिळणार आहे. (Raanti Marathi Movie 2024 ).
तीन मैत्रिणींच्या मैत्रीचा प्रवास आणि त्यांच्या स्वप्नांची सफर दर्शवणारा गुलाबी हा चित्रपट देखील 22 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होतं आहे.या चित्रपटात श्रुती मराठे, अश्विनी भावे आणि मृणाल कुलकर्णी यांच्या भूमिका मुख्य आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभ्यंग कुवळेकर यांनी केले आहे. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी, शैलेश दातार, आणि निखिल आर्या यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. संगीतकार साई-पियुष यांचे संगीत दिले आहे.(Gulabi Marathi Movie)
गुलाबी आणि रानटी चित्रपटांसोबतच धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज हा चित्रपट देखिल या शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात ठाकूर अनुप सिंग यांनी छत्रपती संभाजी महाराज यांची भुमिका साकारली आहे. हा चित्रपट हिंदी आणि मराठी दोन्ही भाषेत प्रदर्शित होतं आहे. तसेच अमृता खानविलकर, किशोरी शहाणे, भार्गवी चिरमुले, आणि मल्हार मोहिते-पाटील हे देखिल महत्वाच्या भूमिकेत आहेत.संदीप रघुनाथ मोहिते पाटील प्रस्तुत आणि उर्विता प्रोडक्शन निर्मित ‘धर्मरक्षक महावीर संभाजी महाराज’ चित्रपटाची निर्मिती शेखर मोहिते पाटील, सौजन्य निकम आणि केतन राजे भोसले यांनी केली आहे.(Dharmarakshak Mahaveer Chhatrapati Sambhaji Maharaj Marathi Movie)
दरम्यान आता पाहावे लागेल की रानटी,गुलाबी आणि धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज या तीन चित्रपटापैकी कोणता चित्रपट बॉक्स ऑफिस वर आपली जादू दाखवण्यात यशस्वी होईल.
हेही वाचा :- “मी या सिनेमात जे काही केलं ते..” ‘हंटर’ मधील ‘त्या’ बोल्ड सीनवरबद्दल सई ताम्हणकर पहिल्यांदाच बोलली